कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur Crime) दिवसाढवळ्या खून, मारामाऱ्या होत असतानाच आणखी एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून टोळीयुद्ध भयंकर प्रमाणात उद्भवलं असून गलोगल्ली आणि विशेष करून झोपडपट्ट्यांमध्ये दादागिरीचे प्रकार समोर येत आहेत. आता याच मालिकेमधील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. टोळीयुद्धातील गुन्हेगारांकडून दोघांना बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काठी फुटेपर्यंत दोघांना मारल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. 


काठीने अमानुष मारहाण होत असताना बाजूचे हसण्यात गुंग


दोघांना काठीने अमानुष मारहाण होत असताना बाजूला असलेले काहीजण हसताना दिसून येत आहेत. त्यामुळे हा नेमका प्रकार हा आहे तरी काय? असाच प्रश्न हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर उपस्थित झाला आहे. कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून आणि विशेष करून सोशल मीडियामधील खुन्नसमधून खून होण्याचे प्रकार घडले आहेत. 




झोपडपट्टी भागांमध्ये गुंडगिरी प्रवृत्ती वाढली


काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा झालेला खून हा रिल्समधील खुन्नसमधून झाला होता. त्यापूर्वी रंकाळ्यावर सुद्धा झालेला खून त्याच मालिकेतील होता. कोल्हापूर शहरातील झोपडपट्टीमध्ये वाढलेली गुन्हेगारी प्रकर्षाने दिसून येत असताना सुद्धा पोलिसांकडून कोणतीही ठोस उपाययोजना झालेली दिसून येत नाही. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी एकाला रिल्समधून दादाकिरी करणाऱ्याला चांगलातच धडा शिकवला होता. मात्र, त्यानंतरही पोलिसांची जरब बसली नसल्याचे चित्र आहे. 


कोल्हापूरच्या झोपडपट्टी भागांमध्ये विशेष करून गुंडगिरी प्रवृत्ती वाढत चालली आहे. गलोगल्ली फाळकूट दादा तयार झाले आहेत. त्यामुळे या भुरट्या फाळकूट दादांना वेळीच आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे. खुलेआम मिळणारा गांजा सुद्धा पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या