Sanjay Mandlik : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेमधील 40 आमदार फुटले आहेत. त्यामुळे आता खासदारांमध्येही अस्वस्थता पसरली आहे का? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज खासदारांची बैठक बोलावली आहे.


या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आगामी राष्ट्रपती निवडणुकीमध्ये यांना पाठिंबा द्यायचा की नाही? कारण या संदर्भात काही शिवसेना खासदारांनी भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी पत्र लिहून मागणी केली आहे. दरम्यान, आजतच्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या 18 पैकी 12 खासदारांनी उपस्थिती लावली, तर सहा खासदार अनुपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा चर्चेला पेव फुटला आहे. 


अनुपस्थित खासदारांमध्ये कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचाही समावेश आहे. दरम्यान त्यांनी यासंदर्भात का अनुपस्थित राहिलो याबाबत खुलासा केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने दिल्लीमधील बैठकीला उपस्थित राहिल्याने मुंबईतील बैठकीला उपस्थित राहू शकलो नसल्याचे त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. 


दरम्यान या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे, भावना गवळी आणि संजय जाधव यांनी दांडी मारली आहे. भावना गवळी लोकसभेच्या गटनेतेपदावरून अलीकडेच हटवण्यात आले आहे. दरम्यान द हिंदू या इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार शिवसेनेमध्ये आमदारांपाठोपाठ खासदारही बंडखोरीच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे.  अनेक खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. 


उपस्थित खासदार
1. गजानन कीर्तिकर
2. अरविंद सावंत
3. विनायक राऊत
4. हेमंत गोडसे
5. धैर्यशील माने
6. प्रताप जाधव
7. सदाशिव लोखंडे
8. राहुल शेवाळे
9. श्रीरंग बारणे 
10. राजन विचारे
11. ओमराजे निंबाळकर 
12. राजेंद्र गावित 


शिवसेनेचे अनुपस्थित खासदार
1. यवतमाळ-वाशिम - भावना गवळी
2. परभणी - संजय जाधव
3. कोल्हापूर - संजय मंडलिक
4. हिंगोली - हेमंत पाटील
5. कल्याण-डोंबिवली - श्रीकांत शिंदे
6. रामटेक - कृपाल तुमाने
7. दादरा-नगर हवेली - कलाबेन डेलकर


राज्यसभा खासदार उपस्थित
1. संजय राऊत 
2. प्रियांका चतुर्वेदी


अनिल देसाई (दिल्लीला आहेत)


इतर महत्वाच्या बातम्या