Shivaji University Exam : शिवाजी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा लांबणीवर, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय
शिवाजी विद्यापीठाकडून उद्यापासून सुरु होणाऱ्या सर्व परीक्षा लांबणीवर ढकलण्यात आल्या आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार उन्हाळी सत्रातील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा उद्यापासून प्रारंभ होणार होता.

Shivaji University Exam : शिवाजी विद्यापीठाकडून उद्यापासून सुरु होणाऱ्या सर्व परीक्षा लांबणीवर ढकलण्यात आल्या आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार उन्हाळी सत्रातील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा उद्यापासून प्रारंभ होणार होता.
गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांनी विद्यापीठाने उन्हाळी सत्रातील सर्व परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू स्वरूपात घेण्यासाठी आंदोलन छेडले होते. मागील आठवड्यापासून याची व्याप्ती वाढवली होती. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने अभियांत्रिकी, विधी अभ्यासक्रमाची परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू, तर उर्वरीत सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन वर्णनात्मक घेण्याचा निर्णय जाहीर केला.
मात्र, विद्यार्थी संघटना सर्व परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू स्वरूपात घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत. सर्व विद्यार्थी संघटनांच्या कृती समितीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी शुक्रवारी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थ्यांची मागणी सोमवारी विद्या परिषद या अधिकारमंडळासमोर विद्यापीठ प्रशासनाकडून ठेवण्यात येणार आहे. त्यातील निर्णयानंतर परीक्षेचे स्वरूप आणि सुधारित वेळापत्रक जाहीर होणार आहे.
Before You Go
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती






















