Kolhapur News : युवासेना प्रमुख बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन निष्ठा यात्रा काढत आहेत. या यात्रेत त्यांना सर्वसामान्य जनता तसेच शिवसैनिकांकडून मिळत असलेल्या प्रतिसाद पाहून बंडखोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.  

Continues below advertisement


आदित्य यांची निष्ठा यात्रा दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचली. या दौऱ्यामध्ये अनेक शिवसैनिकांनी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांना पाठिंबा व्यक्त केला. या सर्व शिवसैनिकांना कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार यांनी आपल्या निवासस्थानी बोलवून औक्षण केलं. जिल्ह्यातील चाळीसहून अधिक शिवसैनिकांचे पवार यांच्या कुटुंबियांनी औक्षण केले. अशा निष्ठावंतांसाठी माझ्याकडे शब्द नसल्याची प्रतिक्रिया संजय पवार यांनी भावना व्यक्त करताना सांगितले. आदित्य ठाकरे यांच्यासाठी झालेली गर्दी उस्फूर्तपणे होती, ही येणाऱ्या विजयाची नांदी असल्याचे ते म्हणाले. 


उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ला हा बनाव 


कोल्हापूर जिल्ह्यातील निष्ठा यात्रा पार पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सातार जिल्ह्यामध्ये पाटणमध्ये सभा घेतल्यानंतर  पुण्यात कात्रजला सभा घेतली. यावेळी बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला. या हल्ल्यावरून प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, हल्ला करून पळणारे शिवसैनिक असू शकत नाहीत. त्यांच्या गाडीवरील हल्ला हा बनाव असल्याचे ते म्हणाले. 


जे शाहू महाराजांचा निधी थांबवू शकतात ते खोट्या कारवायाही करू शकतात, असा टोलाही बंडखोरांना लगावला. आमचा आता फक्त न्यायव्यवस्थेवरच विश्वास असून न्यायदेवता न्याय देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.