Kolhapur News : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर जिल्ह्याने अनेक पुरोगामी भूमिका घेत राज्याला आदर्श घालून दिला आहे. येथील सामाजिक भूमिका नेहमीच दिशा देणाऱ्या आहेत. शिरोळ तालुक्यातील मजरेवाडीमध्ये हिंदू बांधवांनी एकही मुस्लिम समाजाचे कुटुंब नसताना गावात पीर प्राणप्रतिष्ठापना करत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आहे. इतकेच नव्हे तर स्वखर्चातून आणि लोकवर्गणीतून लाखो रुपये खर्चून प्रतिष्ठापनेसाठी दर्गा उभा केला आहे.


मजरेवाडीमधील हिंदू समाज बांधव पीर प्रतिष्ठापना करून मनोभावे पिराची सेवा करतात. खतम विधीसाठी मानधनावर कुरुंदवाड येथील बापू मुल्ला यांना बोलवले जाते. त्यासाठी त्यांचा मानपान केले जाते. मजरेवाडी हे गाव 3 हजार लोकवस्तीचे आहे. गावात हनुमान मंदिरासमोर पीर-पंजाची प्रतिष्ठापणा करून मोहरम सणाला याठिकाणी चांगले महत्व आले आहे. गावकऱ्यांनी एकत्रित येऊन भव्य असा दर्गा या ठिकाणी बांधला आहे. तर दर्गाचे काम अपूर्ण होते म्हणून काही गावकऱ्यांनी आपल्या शेतीवर कर्ज काढून बांधकाम पूर्ण केले आहे. 




मुसळधार पाऊस अन् मंदिरात पीर बांधणी


कुरुंदवाड येथील बागवान पिराच्या प्रतिष्ठापनेसाठी नालविधीचा कार्यक्रम संपन्न झाला. पिराच्या बांधणीला सुरवात करतानाच मुसळधार पाऊस आल्याने पिराचे पटके भिजू नयेत म्हणून धावपळ सुरु होती. हे पाहताच याच परिसरातील  सावता माळी मंदिरात सुरू असलेले भजन थांबवून हिंदू बांधवांनी पीर सावता माळी मंदिरातच बांधावी अशी विनंती केली. 

बागवान पिराची प्रतिष्ठापना बागवान गल्लीत मंडपात केली जाते. याठिकाणीच पिराची बांधणी केली जाते. पटके भिजू नये सुखरूप रहावे म्हणून शेजारच्या घरात गठ्ठे नेण्यात आले. पीर बांधणी करायची कुठे हा प्रश्न पडलेला असताना सावता माळी मंदिराच्या भक्तांनी पटके उचलून नेत पिराची बांधणी मंदिरात करायची चला असे मुस्लिम समाज बांधवांना निरोप दिला. कुरुंदवाड शहर हे धार्मिक एकात्मतेचं माहेर घर समजले जाते. याच शहरात मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या