Sanjay Ghatge on Shaktipeeth Expressway : सोयीनुसार पक्षबदलाचा सपाटा लावलेल्या संजयबाबा घाटगेंनी आता शक्तीपीठ महामार्ग आंदोलनावरूनही कोलांटी मारली?
शक्तीपीठ महामार्ग विरोधात (Shaktipeeth Expressway) गेल्या एक वर्षापासून आंदोलन सुरु आहे. आंदोलनास समर्थन देणारे शिक्षक गिरीश फोंडे (Girish Phonde) यांच्यावर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे.

Shakti Peeth expressway Agitation : राजकीय सोयीनुसार पक्ष बदलण्याचा सपाटाच लावलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur politics) कागल तालुक्यातील (Kagal) शिवसेना ठाकरे गटाचे Shiv Sena (UBT) माजी आमदार संजयबाबा घाटगे (Sanjay Ghatge) यांनी आता भाजपचा (BJP) झेंडा हाती घेतला आहे. पक्षप्रवेश करताना संजय घाटगे यांनी शक्तीपीठप्रश्नी (Shaktipeeth Expressway) शेतकऱ्यांच्या समस्या मांडू, अशी ग्वाही दिली होती. मात्र, पक्षप्रवेशानंतर अवघ्या तीन दिवसात त्यांना विसर पडला आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शक्तीपीठ आंदोलन (Shaktipeeth Expressway Agitation) सक्रिय असलेल्या कोल्हापूर मनपाचे गिरीश फोंडे यांच्या तडकाफडकी निलंबनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti on Shaktipeeth Expressway) यांच्या नेतृत्वात आज कोल्हापुरात मोर्चा काढण्यात आला. कोल्हापुरातून भवानी मंडप ठिकाणाहून कोल्हापूर महानगरपालिकेवर हा मोर्चा धडकला. या मोर्चात संजयबाबा घाटगे दिसून आले नाहीत. त्यामुळे पक्ष बदलताच भूमिका बदलली का? असा प्रश्न विचारला जात आहे.
दरम्यान, शक्तीपीठ महामार्ग विरोधात (Farmer protests over Shaktipeeth Expressway) गेल्या एक वर्षापासून आंदोलन सुरु असून आंदोलनास समर्थन देणारे शिक्षक गिरीश फोंडे (Girish Phonde) यांच्यावर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. या मोर्चात इंडिया आघाडी, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, शिक्षक संघटना समन्वय समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत.
भाजपवासी होताच शक्तीपीठकडे पाठ
भाजप प्रवेशानंतर माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी आता शक्तीपीठ महामार्ग बाबतची भूमिका बदलली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यापूर्वी शक्तीपीठ विरोधातील निघणाऱ्या मोर्चामध्ये संजयबाबा घाटगे सक्रिय होते. शक्तीपीठ विरोधात कागल तालुक्यासह अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांची मोट संजयबाबा घाटगे यांनी बांधली होती. मात्र, भाजप प्रवेश होताच संजय बाबा घाटगे यांची शक्तिपीठ प्रश्नांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
तीन दिवसात भूमिकेचा विसर पडला?
दरम्यान, मंगळवारी भाजपमध्ये (BJP Maharashtra) सामील झालेले संजय घाटगे यांनी सांगितले की, प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाबाबत कागल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडल्या जातील, जे यावर तोडगा काढतील, असे म्हटले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय घाटगे, त्यांचे पुत्र अंबरीश आणि इतर प्रमुख कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विकासकामांना पाठिंबा असल्याचे सांगितले होते. शक्तीपीठ महामार्गाचे कट्टर विरोधक घाटगे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ यांना पाठिंबा देण्यासाठी तो रद्द करण्याची अट घातली होती. त्यानंतर मुश्रीफ यांनी 86 हजार कोटी रुपयांच्या महामार्ग प्रकल्पाच्या कोल्हापूरला वगळण्याची राज्य सरकारची अधिसूचना मिळवून दिली.
कागलची तिरंगी लढत मुश्रीफांना सातत्याने बळ देत आहे
संजय घाटगे यांचा कागलमध्ये मोठा गट आहे. 1998 च्या विधानसभा पोटनिवडणुकीत मुश्रीफ यांचा पराभव करून ते आमदार म्हणून निवडून आले. परंतु तेव्हापासून घाटगे यांनी पाच वेळा मुश्रीफ यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली, पण विजयी झाले नाहीत. तथापि, त्यांनी सातत्याने 50 ते 60 हजार मते मिळत आली आहेत. ही मते मुश्रीफ यांच्या विजयासाठी निर्णायक आणि समरजितसिंह घाटगे यांच्यासाठी अडचणीची ठरत आली आहेत. कागलची तिरंगी लढत मुश्रीफांना सातत्याने बळ देत आहे. त्यामुळे आता संजय घाटगे भाजपमध्ये गेल्याने समरजितसिंह घाटगे यांची कोंडी झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























