कोल्हापूर : देशात काय चाललं आहे यापेक्षा आमचं काय चाललंय हे असा ट्रेंड कोल्हापुरात आहे.  शिवाजी महाराजांचा विचार दिल्लीत पाठवणारी ही निवडणूक आहे. गाफिल अजिबात राहू नका, कोल्हापूरमध्ये वातावरणं चांगलं असून किती लाखाने एवढाच विषय असल्याचे प्रतिपादन काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी केले. मविआच्या माध्यमातून चांगलं वातावरणं असल्याचेही त्यांनी नमूद केले. कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ आज गांधी शिव शाहू निर्धार सभा आयोजित करण्यात आली. या सभेला संबोधित करताना सतेज पाटील यांनी फुले शाहू आंबेडकरांना विचारांना मतदान करण्यासाठी संधी असल्याचे सांगितले. 


किती लाखाने जिंकणार एवढाच विषय


आम्ही टी-20 खेळत असून आता शेवटच्या ओव्हर बाकी आहेत, आपला स्कोअर चांगला झाला आहे. आता राहिलेल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी सांगितले की, फुले, शाहू आंबेडकरांचा आवाज धुमधडाक्यात पोहोचला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र कोल्हापूरकडे पाहत आहे. शाहू महाराजांच्या मताधिक्याची उत्सुकता आहे. ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करून सत्ता आणली. शेतकऱ्यांना 72 हजार कोटींची कर्जमाफी देणाऱ्यांना शरद पवारांना फसवलं. अस हे गद्दारांचं सरकार सत्तेत आलं आहे. मतदान करून सरकारविरोधात रोष दाखवण्याची हीच  संधी असल्याचे सतेज पाटील म्हणाले.  


त्यांनी सांगितले की, शाहू महाराजांवर टीका करणार नाही असे सुरुवातीपासून सांगत होते. मात्र,त्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. आमच्यावर टीका करा आम्ही सांगितले होते. मात्र, आम्ही मातीत उतरल्याने कोल्हापूरची जनता चितपट राहिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 


इतर महत्वाच्या बातम्या