'मला कोणीही थांबवू शकत नाही', आतिक्रमणाविरोधात संभाजीराजे विशाळगडावर जाण्यावर ठाम!

विशाळगडावरील आक्रमणावरून संभाजीराजे छत्रपती चांगलेच आक्रमक झाले आहेत. ते विशाळगडावर जाणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

Continues below advertisement

कोल्हापूर : जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमण काढावे अशी मागणी घेऊ संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) आक्रमक झाले आहेत. आज हजारो शिवभक्तांना घेऊन संभाजीराजे हेच्या दिशेनं रवाना होत आहेत. जिल्हा प्रशासनाने संभाजीराजे यांना मोहीम रद्द करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र संभाजीराजे कोणत्याही परिस्थितीत विशाळगडावर जाण्यावर ठाम आहेत. दरम्यान, विशाळगडावर (Vishalgad) जाण्याआधी त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर मला अभिमानच आहे. विशाळगडावरील अतिक्रमण हटवावे अशी माझी मागणी आहे, असे संभाजीराजे म्हणाले आहेत.

Continues below advertisement

हे अतिक्रमण कोणीही खपवून घेऊ शकत नाही

संभाजीराजे विशाळगडाकडे निघाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी या भागात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. केवळ कोल्हापूर जिल्ह्यातून नाही तर महाराष्ट्रातील शिवभक्त या मोहिमेत सहभागी होणार आहेत. याबाबत बोलताना "कुठल्याही शुभ कार्याला, मोहिमेला जायचे असते तेव्हा अंबाबाई, भवानीचे दर्शन घेतो. सिद्दी जोहरने पन्हाळा गडाला वेढा दिला होता. शिवाजी महाराज तिथून सुटका करून विशाळगडाला पोहोचलो. म्हणूनच पावनखिंड संग्राम दिन 13 जुलै रोजी साजरा केला जातो. आज विशाळगड संकटात आहे.या गडाने शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं. या विशाळगडाने स्वराज्याचे संरक्षण केले. ताराराणी यांची ही राजधानी होती. पण या विशाळगडावर अतिक्रमण करण्यात आहे. हे अतिक्रमण कोणीही खपवून घेऊ शकत नाही. म्हणूनच आम्ही सर्व शिवभक्त विशाळगडावर शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी जात आहोत," असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 

गुन्हा नोंद झाला असेल तर मला अभिमान- संभाजीराजे

तसेच, मी एक शिवभक्त आहे. शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांना वंदन करण्यासाठी मला कोणीही थांबवू शकत नाही. मी विशाळगडावर पूर्वीदेखील गेलेलो आहे. आजही मी गडावर जात आहे. विशाळगड अतिक्रमणमुक्त व्हायला हवा, ही आमची मागणी आहे. माझ्यावर गुन्हा नोंद झाला असेल तर मला अभिमान आहे.  सगळे शिवभक्त विशाळगडावर शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी जाणार आहेत, असा ठाम निर्धार संभाजीराजे यांनी व्यक्त केला. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

Weather Forecast : मुंबईत वादळी वारा अन् अतिमुसळधार, कोल्हापूर, साताऱ्यात रेड अलर्ट; पावसाचा लेटेस्ट अंदाज काय?

मोठी बातमी! पुणे पोलिसांनी 'ती' ऑडी कार घेतली ताब्यात, पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढणार?

खळबळजनक! डोनाल्ड ट्र्म्प यांच्या हत्येचा प्रयत्न? भर सभेत गोळीबार

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola