Donald Trump Rally Shooting : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष तथा आगामी निवडणुकीसाठी राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार करण्यात आला. या गोळीबारादरम्यान, ड्रम्प यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात एक गोळी ड्रम्प यांच्या उजव्या कानाला लागून गेली. यामुळे ट्रम्प किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेचे आता जागतिक पातळीवर पडसाद उमटत आहेत.
ट्रम्प यांच्या उजव्या कानाला जखम
मिळालेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेन्सिलव्हॅनिया येथील एका सभेत गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात डोनाल्ड ट्रम्प जखमी झाले आहेत. त्यांच्या डाव्या कानाला बंदुकीची गोळी लागून गेली आहे. या घटनेचे काही व्हिडीओ समोर आले असून त्यांच्या कानाला जखम झाल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटत असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीदेखील या घटनेचा निषेध केला आहे. सध्या डोनाल्ट ट्रम्प सुखरुप आहेत.
ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार
सभेत गोळीबार झाल्याचे दिसताच सुरक्षा रक्षकांनी ट्रम्प यांच्या बाजूने वर्तुळ केले. त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यात आले. सध्या अमेरिकेत निवडणुकीचे वातावरण आहे. येथे राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत ट्रम्प हे रिपब्लिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. याच कारणामुळे त्यांच्यावर झालेल्या या हल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
जो बायडेन यांच्याकडून घटनेचा निषेध
या घटनेनंतर अमेरिकेचे विद्ममान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांच्या सभेदरम्यान झालेल्या घटनेची मी माहिती घेतली आहे. सुदैवाने ट्रम्प सुरक्षित असल्याचे मला समजले. ट्रम्प यांच्या कुटुंबीयांसाठी तसेच या रॅलीमध्ये सहभागी झालेले सर्वजण सुरक्षित असावेत यासाठी मी प्रार्थना करतो. अमेरिकेत अशा कोणत्याही प्रकारच्या हिंसेला स्थान नाही. एक देश म्हणून आपण एकत्र यायला हवे आणि अशा घटनांचा निषेध नोंदवायला हवा, असे बायडेन म्हणाले.
दरम्यान, सभेला आलेल्या एका श्रोत्याचा या गोळीबारात झाला आहे. तर दुसरीकडे हल्लेखोरही मारला गेल्याची माहिती आहे.