एक्स्प्लोर

कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी, अखेर सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरु होणार, 5 नोव्हेंबरपासून पुणे ते कोल्हापूर धावणार

Kolhapur - Mumbai Sahyadri Express : सह्याद्री एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

कोल्हापूर :  कोराना काळात (Covid 19)  बंद केलेली कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस (Kolhapur - Mumbai Sahyadri Express)  दोन वर्षानंतर पुन्हा सुरू होणार आहे. मुंबईत सीएसएमटी स्थानकात (CSMT)  प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे ही एक्स्प्रेस 5 नोव्हेंबरपासून ते 31 डिसेंबरपर्यत कोल्हापूर ते पुणे दरम्यान धावणार आहे. त्यानंतर ही एक्स्प्रेस मुंबईपर्यंतही धावणार आहे. सह्याद्री एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.  

सह्याद्री एक्सप्रेस फेब्रुवारी 2020 पासून बंद करण्यात आली होती.    ट्रेन गेली 30-35 वर्षे धावत होती मात्र कोरोना काळात ही ट्रेन रद्द करण्यात आली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवाशांकडून सह्याद्री एक्स्प्रेस सुरु करण्यासाठी सातत्याने मागणी केली जात आहे.  ट्रेन सुरू करण्यासाठी प्रवाशांनी तसेच अनेक मंत्र्यांनी पाठपुरवा केला.  अखेर कोल्हापुरातून सुटणारी कोल्हापूर ते मुंबई सह्याद्री एक्सप्रेस पुण्यापर्यंत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 नोव्हेंबरपासून रोज रात्री 11.30 वाजता ही रेल्वे कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्थानकावरून सुटेल. ती सकाळी 7.45 वाजता पुण्यात पोहचेल. तर पुण्यातून रोज रात्री 9.45 वाजता सुटून कोल्हापुरात पहाटे 5.40  वाजता पोहचणार आहे.

सह्याद्री एक्स्प्रेस त्वरित सुरू करण्याची मागणी

 कोल्हापूर-पुणे आणि पुणे-कोल्हापूर मार्गावरील प्रवाशांसाठी या वेळा सोयीस्कर होत्या.  कोरोना काळात कोल्हापूर ते मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस बंद करण्यात आली. त्यानंतर दोन वर्षांचा कालावधी लोटूनही सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे हजारो रेल्वे प्रवाशांची गैरसोयीला सामोरे जावे लागते. ज्या महिला मुंबईला जातात, त्यांना तर मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. त्यामुळे सह्याद्री एक्स्प्रेस त्वरित सुरू करण्याची मागणी होत होती.  

जुलै महिन्यात खासदार महाडिक यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेत कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या सुधारणा आणि नव्या रेल्वे गाड्यांसाठी चर्चा केली.  मिरज ते कोल्हापूर या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण मंजूर असूनही काही कारणास्तव हे काम रखडले आहे. त्याबाबतही खासदार महाडिक यांनी रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले. लवकरच मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू होईल आणि त्यानंतर कोल्हापूरहून आणखी काही नव्या रेल्वे गाड्या सुरू करता येतील, असे आश्वासन रावसाहेब दानवे यांनी दिले. कोल्हापूर ते मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस किंवा वंदे भारत एक्स्प्रेस यासह अन्य काही नवीन मार्गांवर रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, यासह कोल्हापूरच्या रेल्वे मागण्यांबाबत, खासदार महाडिक यांनी नामदार दानवे यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. तसेच  सह्याद्री एक्स्प्रेस बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल सुरु असून गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने सातत्याने ही गाडी सुरु करण्याची देखील मागणी केली होती. 

हे ही वाचा :

 

महत्त्वाच्या बातम्या

साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Salman Khan Share Photos With Salim Khan: 'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Thane Crime Pradeep Purnekar Case: राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Embed widget