Kolhapur News : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील नागरिकांना आजपासून थेट मुख्यमंत्र्यांकडे आपल्या तक्रारी, निवेदने सादर करता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल शाखेत आजपासून मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरू झालं आहे. (Regional Office of the Chief Minister's Secretariat Chamber in kolhapur) क्षेत्रीय कार्यालय सुरु झाल्याने नागरिकांची मोठी सोय झाली आहे.
प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कक्षाचे निवासी उपजिल्हाधिकारी हे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी असतील. ज्या नागरिकांना आपले म्हणणे, तक्रारी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, ते या कक्षात आपले अर्ज, निवेदन, कागदपत्रे सादर करू शकतात.
नागरिकांचे प्रश्न, शासनस्तरावरील कामे, निवेदने, अर्ज, संदर्भ मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, मंत्रालय, मुंबई येथे स्वीकारून त्यावर कार्यवाही करण्यासाठी संबंधित क्षेत्रीय स्तरावरील शासकीय यंत्रणेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवली जातात. त्यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे. (Regional Office of the Chief Minister Secretariat Chamber in kolhapur)
राज्यातील प्रत्येक नागरिक, शेतकरी, पीडित, बाधित, प्रकल्पग्रस्त, गरजूगरीब स्थानिक पातळीवर शासकीय कार्यालयांमधून आपले प्रश्न मार्गी लागले नाही तर, तो थेट मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयात तक्रार अर्ज, निवेदन घेऊन येतो. तेथे तो आपला प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. अशाप्रकारे भेटीसाठी येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराला मुख्यमंत्री यांची भेट मिळू शकत नाही. यामुळे अनेक तक्रारदार नागरिक, शेतकरी नाराज होतात. काही शेतकरी ग्रामीण, दुर्गम डोंगरी, आदिवासी भागातून घरातून पहाटे निघून मुंबईत मंत्रालयात आलेले असतात. त्या प्रत्येकाची आपली मुख्यमंत्री यांची भेट व्हावी अशी इच्छा असते. विविध प्रकारच्या बैठका, कार्यक्रम यामुळे प्रत्येक नागरिकाला मुख्यमंत्री भेटीसाठी, त्याचा मार्गी लावण्यासाठी व्यक्तिश भेट देऊ इच्छित नाही.
अशा नागरिकांचे प्रश्न गतिमानतेने, पारदर्शकपणे आणि विनाविलंब जिल्हा स्तरावरच मार्गी लागावेत म्हणून विभागीय मुख्यमंत्री क्षेत्रीय कार्यालयाप्रमाणे आता जिल्हा स्तरावर मुख्यमंत्री जिल्हा क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Regional Office of the Chief Minister Secretariat Chamber in kolhapur)
इतर महत्वाच्या बातम्या