Kolhapur News : एकनाथ शिंदे गटाकडून कोल्हापूर जिल्हाप्रमुखांची घोषणा खासदार धैर्यशील माने आणि राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. माजी शिवसेना जिल्हाप्रमुख रामभाऊ चव्हाण यांचे चिरंजीव सुजित चव्हाण आणि इचलकरंजीचे माजी नगरसेवक रवींद्र माने यांना एकनाथ शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुखपदी नेमण्यात आले आहे.
सुजित चव्हाण यांच्याकडे कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, आणि करवीर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. रवींद्र माने यांच्याकडे हातकलंगले, शाहूवाडी, शिरोळ, पन्हाळा, इचलकरंजी मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना नियुक्तीची पत्रे धैर्यशील माने आणि राजेश क्षीरसागर यांनी दिली.
बंडखोरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक जिल्ह्यात आपल्या गटातील पदाधिकाऱ्यांच्या घोषणा सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशाने या नियुक्त्या करण्यात आहेत. सुजित चव्हाण यापूर्वी शिवसेना शहर उपप्रमुख पदावर होते. त्याचबरोबर शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष आहेत. रवींद्र माने यांनी इचरकरंजी नगरपालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
एकनाथ शिंदे गटाकडून कोल्हापूर जिल्ह्यासह तालुका शहर आणि विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांची घोषणाही करण्यात येणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची पूर्णपणे उघडीप, पंचगंगेचा आठ दिवसांनी पात्राकडे प्रवास
- Kolhapur News : कोल्हापूरमध्ये यंदा गणेश विसर्जनासाठी इराणी खाणीमध्ये स्वयंचलित यंत्रणा असणार
- Kolhapur News : वयाच्या 64 व्या वर्षी कोल्हापूरचा वाघ 75 किमी पळतोय! स्वातंत्र्यदिनी रंकाळ्याभोवती 9 तास 9 मिनिटांत 17 फेऱ्या मारून 75 किमी धावण्याचा विक्रम