Kolhapur News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सवांतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात 11 वाजता "सामूहिक राष्ट्रगीत गायन" उत्साहात संपन्न झाले.  जिल्ह्यातील शासकीय, खासगी आस्थापना, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठामध्ये 'सामूहिक राष्ट्रगीत गायन' उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले. सामूहिक राष्ट्रगीत गायनासाठी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच महसूल विभाग, जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.