Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा पूर्णत: ओसरल्याने गेल्या आठ दिवसांपासून इशारा पातळीवर वाहत असलेली पंचगंगा नदी आज पात्रात परतण्याची शक्यता आहे. पंचगंगेची पातळी 32 फुटांवर आली आहे. जिल्ह्यातील बंधाऱ्यांवरील पाणी वेगाने कमी होत असून आता केवळ 29 बंधाऱ्यांवर पाणी आहे. गेल्या 24 तासांमध्ये सहा फुटाने खाली आली.
दुसरीकडे राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र.6 हा एकमेव खुला असून सध्या धरणातून 3028 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदी गेल्या आठ दिवसांपासून इशारा पातळीवर वाहत असल्याने महापूराची टांगती तलवार होती. मात्र, चार दिवसांपासून दिलेल्या उघडीपमुळे संकटातून सुटका झाली आहे. दुसरीकडे अलमट्टी धरणातून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग सुरु आहे.
खालील बंधारे पाण्याखाली आहेत
- पंचगंगा नदी-शिंगणापूर,राजाराम,सुर्वे,रुई,इचलकरंजी, तेरवाड,शिरोळ
- भोगावती नदी-हळदी,सरकारी कोगे,राशिवडे, शिरगांव,खडक कोगे
- कासारी नदी- यवलूज,पुनाळ तिरपण,ठाणे आळवे
- वेदगंगा नदी- बस्तवडे व चिखली
- वारणा नदी- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी
- दुधगंगा नदी- दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली व बाचणी,
- तुळशी नदी- बीड
कोल्हापूरमध्ये गेल्या 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 39.6 मिमी पाऊस
24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमीमध्ये
- हातकणंगले 3.6
- शिरोळ - 1.2
- पन्हाळा- 21.5
- शाहूवाडी- 25
- राधानगरी- 23
- गगनबावडा- 39.6
- करवीर- 11.5
- कागल- 5.9
- गडहिंग्लज- 3.3
- भुदरगड 7.6
- आजरा- 12.7
- चंदगड- 7.6
जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
- राधानगरी 8.30
- तुळशी 3.36
- वारणा 30.85
- दूधगंगा 22.81
- कासारी 2.65
- कडवी 2.52
- कुंभी 2.53
- पाटगाव 3.50
- चिकोत्रा 1.50
- घटप्रभा 1.56
- आंबेआहोळ 1.09
- जंगमहट्टी,जांबरे,चित्री मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत
इतर महत्वाच्या बातम्या