एक्स्प्लोर

कुस्ती लढायची असेल तर मर्दासारखी लढा, रडीचा डाव खेळू नका, बावड्याचा पाटील कधी मागं पडणार नाही; सतेज पाटलांचे महाडिकांना जाहीर आव्हान

आमचं शक्ती प्रदर्शन बघितल्यानंतर त्यांचं डोकं चालायला सुरुवात झालं. लोकांमध्ये जाऊन ही निवडणूक जिंकू शकत नाही हे महाडिकांच्या शंभर टक्के लक्षात आल्याने रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.

Rajaram Sakhar Karkhana : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सतेज पाटील गटातील 29 उमेदवार अपात्र ठरल्यानंतर तगडा झटका बसला आहे. नियमानुसार ऊस कारखान्याला न घातल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. या निर्णयानंतर आमदार सतेज पाटील यांनी जाहीर सत्ताधारी महाडिक गटाला जाहीर आव्हान दिले आहे. या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार, त्याठिकाणी न्याय मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे. हा काळा दिवस असल्याचे सांगत पहिला बंटी पाटील 12 तास राबत होता पण आजचा निकाल बघता 24 तास राबणार, असल्याचे ते म्हणाले. 

सतेज पाटील यांनी उमेदवार अपात्र ठरल्यानंतर महाडिक गटावर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, दप्तरच त्यांच्या हातामध्ये असल्यामुळे काय गडबड करणार याचा अंदाज येणं शक्य नव्हतं. आमचं शक्ती प्रदर्शन बघितल्यानंतर त्यांचं डोकं चालायला सुरुवात झालं. लोकांमध्ये जाऊन ही निवडणूक जिंकू शकत नाही हे महाडिकांच्या शंभर टक्के लक्षात आल्याने रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न केला. दबावाच्या राजकारणातून हा निर्णय घेण्यात आला. 

सहकारातला आजचा काळा दिवस म्हणावा लागेल 

ते पुढे म्हणाले की, आमच्या 28 लोकांना जो निकष लावला तोच निकष सगळ्यांना लावला का? राज्याच्या सहकारातील आजचा काळा दिवस म्हणावा लागेल. आमचे सगळ्या गटामध्ये अर्ज शिल्लक आहेत, त्यांचा एकही उमेदवार बिनविरोध होत नाही. 25 वर्षाचा कारभार चोख नाही म्हणून डाव्या बाजूला न बोलता बसले होते. ही निवडणूक राजारामची आहे की डी वाय पाटील कारखान्याची आहे?

आता 24 तास काम करणार 

त्यांनी पुढे सांगितले की, एकदा हातात गोष्ट घेतली की थांबायचं नाही, तुम्ही काळजी करू नका. महाडिक किती घाबरले आहेत हे कोल्हापुरातील लोकांना जाऊन सांगूया. रडीचा डाव करून लोकांना बाजूला करण्याचा डाव घातला. लांग घातली होती तर कुस्ती खेळायचे होती एवढी खुमखुमी होती. एवढी ताकत होती तर उद्याच्या उद्या मैदानात या. माझे 21 उमेदवार तुम्हाला धूळ चारल्याशिवाय राहणार नाहीत. कुस्ती लढायची असेल तर मर्दासारखे लढा बावड्याचा पाटील कधी मागं पडणार नाही. तुम्ही चांगलं केलं रडीचा डाव खेळला. मी 14 तास काम करणार होतो आता 24 तास काम करणार. आता पाठ सोडणार नाही, पत्ता त्यांनी टाकला असला तरी डाव मात्र आम्ही जिंकणार आहे. पत्ता कोणताही असूदे तिकडे जोकर आहे. ही लढाई महाडिक विरुद्ध बंटी पाटील नाही तर 12,000 सभासदांची आहे. उमेदवार कोण आहे याचा विचार करू नका पायाला पान बांधून कामाला लागा.  या निवडणुकीत आता दोन पावलं नाही तर दहा पावलं पुढे टाकायचे आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूर हादरलं! MD ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा उघड, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, कारवाईनं खळबळ  
कोल्हापूर हादरलं! MD ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा उघड, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, कारवाईनं खळबळ  
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Embed widget