Radhanagari Vidhan Sabha : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Viddhan Sabha) कागलमधून हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर कोल्हापूरमधील सर्वच मतदारसंघांमध्ये इच्छुकांकडून मोर्चेबांधणीसाठी जोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक घडामोडी राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून होत आहेत. या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आंबिटकर निवडणूक लढवणार हे निश्चित असले तरी त्यांच्या विरोधात कोण असणार याची चर्चा मात्र गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. 


के. पी. पाटलांचे महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरु


कोल्हापूर भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी सुद्धा पक्षाला रामराम करत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील यांनी सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. के. पी. पाटील यांनी महाविकास आघाडीकडून आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, त्यांना अजूनही कोणत्याच पक्षाकडून शब्द आला नसल्याची माहिती आहे.


के. पी. पाटील मशाल हाती घेणार?


के. पी. पाटील यांनी आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट या तिन्ही पक्षांकडे आपल्या उमेदवारीसाठी चाचपणी केली आहे. मात्र, के. पी. पाटील यांना अजूनही कोणता शब्द आलेला नाही. दरम्यान, के. पी. पाटील यांनी उमेदवारीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली होती. मात्र, उमेदवारीची चर्चा पुढे गेली नव्हती. मात्र, येत्या दोन ते चार दिवसात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि के. पी. पाटील यांची भेट होणार असल्याची चर्चा आहे. बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराटे यांच्या निधनाने भेट पुढे गेली आहे. त्यामुळे राधानगरीमधून के. पी. पाटील मशाल हाती घेणार का? याची आहे. 


तत्पूर्वी, राष्ट्रवादीत प्रवेश करत असलेल्या समरजित घाटगे यांच्या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी के. पी. पाटील यांची भेट झाली होती, असे म्हटले होते. त्यामुळे के. पी. पाटील यांच्याकडून महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या