Prakash Abitkar : राधानगरी विधानसभेला इतिहासाच प्रथमच आमदारकीची हॅट्ट्रिक केल्यानंतर आमदार प्रकाश आबिटकर यांना मंत्रीपदाची सुद्धा लाॅटरी लागली आहे. शिवसेनेकडून 12 जणांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली असून प्रकाश आबिटकर यांना कोल्हापूर जिल्ह्यातून संधी देण्यात आली आहे. प्रकाश आबिटकर यांनी 33व्या क्रमांकावर कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे प्रकाश आबिटकर यांच्या रुपाने प्रथमच राधानगरी मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. आबिटकर यांना कॅबिनेटची संधी देण्यात आल्याने तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बॅकलाॅग भरुन काढण्यासाठी दिलेला शब्द सुद्धा पूर्ण केला आहे. कोल्हापूरमधून राजेश क्षीरसागर आणि प्रकाश आबिटकर यांच्यामध्ये चुरस होती. मात्र, आबिटकर यांनी बाजी मारली आहे.
पंचायत समितीमधून राजकीय श्रीगणेशा
सन 1997 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी ते गारगोटी पंचायत समिती अपक्ष म्हणून निवडणूक लढवली व मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. पुढे त्यांनी उपसभापती म्हणूनही चांगल्या प्रकारे काम पाहिले. सन 2002 ते 2007 या दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून उल्लेखनीय कामगीरी केली.राधानगरी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी युवा संघर्ष नावाची संघटना स्थापन करून मतदार संघातील न्याय मागण्यांसाठी आंदोलने व मोर्चे काढले.
जनरेट्यामुळे 2009 मध्ये विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय, या निवडणूकीमध्ये त्यांना 36000 हजार हून अधिक मते मिळाली. 2014 सालची विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढवली. आमदार के.पी.पाटील यांचा दारूण पराभव करत 1,32,485 इतकी मते मिळवली व जिल्ह्यात विक्रमी 40 हजार हून मताधिक्याने निवडून आले. 2014 ते 2019 दरम्यान मतदार संघ व त्यातील विविध प्रश्न मार्गी लावल्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवून आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2019 च्या निवडणूकीमध्ये बाजी मारत शिवसेनेचा गड राखण्याचे काम केले. कोल्हापूर जिल्ह्यात 2014 मध्ये 6 शिवसेनेचे आमदार होते, यापैकी 5 आमदारांचा पराभव झाला होता.
आमदार प्रकाश आबिटकर यांचा राजकीय प्रवास
- सन 1997 ते 2002 : सदस्य, पंचायत समिती, भुदरगड
- सन 1997 ते 1998 : उपसभापती, पंचायत समिती, भुदरगड
- सन 2002 ते 2007 : सदस्य, जिल्हा परिषद, कोल्हापूर, सदस्य, स्थायी समिती, जिल्हा परिषद, कोल्हापूर
- सन 2008 : संचालक, भूविकास बँक, कोल्हापूर
- सन 2014 ते 2019 : आमदार, राधानगरी विधानसभा
- सन 2019 ते 2024 : आमदार, राधानगरी विधानसभा
- सन 2024 ते 2029 : आमदार, राधानगरी विधानसभा
प्रकाश आबिटकरांना मिळालेले पुरस्कार
1. उत्कृष्ठ जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजर्षी शाहू पुरस्कार.
2. आर.आर.पाटील फौंडेशन, महाराष्ट्र राज्य प्रस्तुत लोकमत विधिमंडळ पुरस्कार यांचा उत्कृष्ट अभ्यासू वक्ता पुरस्कार (विधानसभा सदस्य).
3. 8 व्या भारतीय छात्र सांसद मध्ये आदर्श युवा आमदार पुरस्कार.
4. उपाध्यक्ष, कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे (MCAER) (मंत्री दर्जा)
5. अध्यक्ष, सेवा प्रवेश मंडळ (कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे)
6. महाराष्ट्र विधानमंडळ राष्ट्रकुल संसदीय मंडळ शाखेच्या वतीने देण्यात येणारा सन 2019-20 सालचा उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार (विधानसभा) देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुजी यांच्या शुभहस्ते देण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या