एक्स्प्लोर

Ambabai Mandir : अंबाबाई किरणोत्सव मार्गात अजूनही अडथळे, अतिक्रमण हटवण्यासाठी देवस्थान समितीकडून कोल्हापूर मनपाला पत्र

अंबाबाईच्या किरणोत्सव मार्गामध्ये अजूनही अडथळे कायम आहेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने कोल्हापूर महानगरपालिकेला महाद्वार रोडवरील अतिक्रमणे काढण्यासाठी पत्र लिहिले आहे.

Ambabai Mandir : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या (Ambabai Mandir) किरणोत्सव मार्गामध्ये अजूनही अडथळे कायम आहेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने कोल्हापूर महानगरपालिकेला महाद्वार रोडवरील अतिक्रमणे काढण्यासाठी पत्र लिहिले आहे. किरणोत्सवाला कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी देवस्थान समितीने मनपाला पत्र पाठवले आहे. अंबाबाई मंदिरात किरणोत्सव 30 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्याच तयारीचा एक भाग म्हणून, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने किरणोत्सव मार्गाचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानंतर सूर्यकिरणांच्या मार्गात अजूनही अनेक अडथळे असल्याचे आढळून आले. दरम्यान, मनपा अधिकारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य पुन्हा एकदा 23 जानेवारी रोजी मावळत्या सूर्याच्या किरणांचे संयुक्तपणे सर्वेक्षण करणार आहेत. 

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे म्हणाले की, अंबाबाई मंदिर, किरणोत्सव मार्गावरील अडथळे कोल्हापूर मनपाने तातडीने दूर करावेत, अशी मागणी करणारे पत्र देवस्थान समितीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले आहे. किरणोत्सव मार्गातील अडथळ्यांची पाहणी 23 जानेवारीला करायची असून सर्वेक्षणासाठी मनपाचे शहर अभियंता, नगररचना सहायक अभियंता, बी वाॅर्ड अधिकारी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहनही आम्ही केले आहे. अंबाबाई मंदिरात वर्षातून दोनदा किरणोत्सव साजरा केला जातो. यामध्ये 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी आणि यानंतर 9 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत किरणोत्सव सोहळा साजरा केला जातो. 

दरम्यान, 9 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या किरणोत्सवावेळी काही इमारतींचे पत्रे, फलक, झाडाच्या फांद्या असे विविध अडथळे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे किरणोत्सव अपूर्ण राहून भाविकांची निराशा होते. या पार्श्वभूमीवर आगामी 30 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या किरणोत्सवापूर्वी हे अडथळे काढावे लागणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Kolhapur Crime News: लग्नाचा तगादा; अनैतिक संबंधातून वाद, माजी महिला सरपंचाला संपवलं; मृतदेह कारच्या डिकीत टाकून भल्या पहाटे पाहुण्यांच्या घरी पोहोचला, नातेवाईकाने फोन फिरवला अन्....
लग्नाचा तगादा; अनैतिक संबंधातून वाद, माजी महिला सरपंचाला संपवलं; मृतदेह कारच्या डिकीत टाकून भल्या पहाटे पाहुण्यांच्या घरी पोहोचला, नातेवाईकाने फोन फिरवला अन्....
Kolhapur Crime News: म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
काँग्रेसविरुद्ध भाजप रस्त्यावर, राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची, बॅरिकेड्सही ढकलले
काँग्रेसविरुद्ध भाजप रस्त्यावर, राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची, बॅरिकेड्सही ढकलले

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget