First Women Maharashtra Kesari: महाराष्ट्रात होत असलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या (Women's Maharashtra Women Kesari) आयोजनावरून आणि नेमकी कोणती खरी? यावरून आता तीन ठिकाणांवरून कुस्ती लागली आहे. त्यामुळे पहिलीच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राज्य कुस्तीगीर स्पर्धेकडून 23 आणि 24 मार्चला सांगलीमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे, भारतीय कुस्ती परिषदेच्या अस्थायी समितीने 1 ते 7 एप्रिल दरम्यान पुण्यात स्पर्धा होणार असल्याची घोषणा केली आहे.  


हे सुरु असताना दीपाली सय्यद यांनी केलेल्या दाव्यानंतर पुन्हा नवा वाद सुरु झाला आहे. दीपाली सय्यद यांनी कोल्हापुरात होणारी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही राज्य सरकारची अधिकृत स्पर्धा असल्याचा दावा दीपाली सय्यद यांनी केला आहे. त्यामुळे कुस्ती क्षेत्रात वादंग निर्माण झाले आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे. त्यामुळे कोणाची स्पर्धा अधिकृत यावर आता तोडगा काढण्याची वेळ आली आहे. 


कुस्ती आयोजनावरून दावे प्रतिदावे 


महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडल्यानंतर महिला कुस्ती स्पर्धा आयोजनाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत 22 आणि 23 मार्चला कुस्ती स्पर्धा घेण्याचे निश्चित झाले असल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी केली होती. मात्र, महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा अस्थायी समितीने पुण्यात घेण्याचे निश्चित केल्याने महाराष्ट्र कुस्ती संघातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.


राष्ट्रीय कुस्तीगीर महासंघाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त केल्याने दोन गटात दावे-प्रतिदावे झाले हाते. माजी खासदार रामदास तडस यांच्या संघटनेला महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याची मान्यता मिळाल्यानंतर बाळासाहेब लांडगे गटाने माघार घेतली होती. आता बाळासाहेब लांडगे यांनी सांगलीत 23 आणि 24 मार्चला महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा आयाोजित केली आहे.


बाळासाहेब लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेस संलग्न 45 संस्था आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील संस्था आमच्याशी जोडल्या असल्याने ऑलिम्पिकची मान्यता आम्हास सर्वात जुनी कुस्तीगीर परिषद म्हणून आहे. उच्च न्यायालयाने देखील कुस्ती घेण्यासाठी आम्हास मान्यता दिली आहे. अस्थायी समितीचे अस्तित्व कायम नसून आम्ही आमच्या सर्व स्तरातील स्पर्धा आयोजित करत आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :