एक्स्प्लोर

Raju Shetti : नितीन गडकरींचा कोल्हापूर दौरा अन् राजू शेट्टींच्या घरी पाहुणचार; माजी खासदार म्हणाले, या भेटीमध्ये...

Raju Shetti : केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना स्वाभिामानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.

Raju Shetti : केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना स्वाभिामानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीत राजू शेट्टींच्या (Raju Shetti) मातोश्रीकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर, मा. जि. प. सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

नितीन गडकरी यांनी थेट राजू शेट्टी यांच्या घरी भेट दिल्याने कोल्हापूर जिल्ह्यात अनेकांच्या भूवया उंचावल्या. गडकरी नरसोबावाडीमध्ये असताना त्यांनी राजू शेट्टी यांच्या घरी जाऊन भेट दिली. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी स्वागत केले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शेट्टी भाजपसोबत होते. मात्र, मोदी सरकारने कृषी क्षेत्रासाठी अवलंबलेल्या धोरणांवर मतभेद झाले आणि ते दूर गेले आणि 2019 मध्ये, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी हातमिळवणी केली. मात्र, त्यांचा धैर्यशील माने यांच्याकडून पराभव झाला. 

त्यानंतर शेट्टी यांनी भविष्यात कोणत्याही पक्षाशी किंवा आघाडीशी संबंध ठेवणार नसल्याची घोषणा केली. परंतु, विद्यमान खासदार धैर्यशील माने शिंदे गटात सामील झाले आहेत. दुसरीकडून भाजपकडूनही या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेचा भाग म्हणून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही या मतदारसंघात भेट दिली. 

राजकारणाशी काहीही संबंध नाही 

मात्र गडकरी यांच्या भेटीचा राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचे शेट्टी म्हणाले. त्यांनी सांगितले की, “आमची मैत्री त्या दिवसांपासून आहे जेव्हा ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते आणि मी तरुण आमदार होतो. मी त्यांच्या दिल्लीतील घरी अनेकदा दुपारचे जेवण केले आहे. ते कोल्हापुरात येत असल्याचे ऐकून मी त्यांना माझ्या घरी येण्याची विनंती केली. आणि ते दुसरा कोणताही विचार न करता आले.” ते पुढे म्हणाले की ते पुन्हा भाजपमध्ये जाण्याची शक्यता नाही. “मला वाटत नाही की भविष्यात आपण कोणत्याही प्रकारची राजकीय व्यवस्था करू शकतो. कारण अलिकडील काळात पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी स्वीकारलेल्या धोरणांवर मी खूप टीका करत आहे.”

फुड क्लस्टरमधील प्रकल्पांचे उद्घाटन

दरम्यान, स्वाभिमानी को ॲाप इंडस्ट्रीयल इस्टेटच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या फुड क्लस्टरमधील प्रकल्पांचे उद्घाटन नितीन गडकरी यांचे हस्ते करण्यात आले. राज्यातील पहिल्या शेतकरी औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीने 20 एकर क्षेत्रामध्ये फुड क्लस्टर मंजूर केले आहे. यामध्ये 5 हजार टनाचे वेअर हाऊस, 3 हजार टन कोल्ड स्टोअरेज, फ्रुटस, व्हेजिटेबल, ग्रेन, पल्सेससाठी शॅार्टिंग ग्रीडींग, फुड टेस्टींग लॅब या पायाभूत सुविधा या फुड क्लस्टरच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या आहेत. 

सध्या या क्लस्टरमध्ये चकोते ग्रुपचे कुकीज, नमकीन व केक बेकचे 3 प्रकल्प, स्वाभिमानी डेअरी, ॲाईल इसेन्स एक्सट्रॅक्शन युनिट, राईस मिल, ॲाईल मिल या प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. या प्रकल्पामध्ये जवळपास 1600 हून अधिक कामगारांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होत आहे. अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये पायाभूत सुविधा देणारे पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिला प्रकल्प असून सदर क्लस्टरचे जवळपास 95 टक्के काम पूर्ण झाले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget