Kolhapur Crime : मुलीला फोन करतो म्हणून मोबाईल मागून घेतला अन् गाडीला किक मारून झाला फरार!

मुलीला दवाखान्यात न्यायचं असून तिला जरा अर्जंट फोन लावण्यासाठी मोबाईल देणार का? अशी विचारणा करून मोबाईल घेतला. त्या दुचाकीस्वाराने मोबाईल घेतल्यानंतर काही क्षण बोलल्याचे दाखवून देत मोबाईलसह फरार झाला.

Continues below advertisement

Kolhapur Crime : बऱ्याचवेळा चोरांनी चोरी करण्यासाठी लढवलेली क्लुप्ती त्या चोरीपेक्षा चर्चेचा विषय होऊन जातो. कोल्हापूर जिल्ह्यामध्येही (kolhapur Crime) असाच एक प्रसंग समोर आला. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीमधील एका तरुणावर काही क्षणांमध्ये हातातील मोबाईल गमावण्याची वेळ आली. रात्री दहाच्या सुमारास एका दुचाकीस्वाराने निशिकांत कांबळे यांना कामावरून परत येत असताना हात दाखवून थांबवले. यावेळी मुलीला दवाखान्यात न्यायचं असून तिला जरा अर्जंट फोन लावण्यासाठी मोबाईल देणार का? अशी विचारणा करून मोबाईल घेतला. त्या दुचाकीस्वाराने मोबाईल घेतल्यानंतर काही क्षण बोलल्याचे दाखवून देत मोबाईलसह फरार (Mobile Phone Stolen) झाला.  मोबाईल घेऊन पळाल्यानंतर चोराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तो पसार होण्यात यशस्वी झाला. त्याने हेल्मेट घातले होते. या प्रकरणी हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

Continues below advertisement

गडहिंग्लजमध्ये गळ्यातील दागिना हिसकावून नेला 

दरम्यान, गडहिंग्लज तालुक्यातील साडे तीन तोळ्याचा दागिना हिसका मारून पळवून नेल्याची घटना घडली. सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मोटारसायकलने येत दोन तरुणांनी हे कृत्य केले. गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे दागिना हिसडा मारून पळवून नेल्याची तक्रार मीनाक्षी जंगमनी यांनी  पोलिसांमध्ये फिर्याद (Police FIR) दाखल केली आहे. मीनाक्षी आपल्या मुलीसह घराकडे चालत असतानाच मोटरसायकवलरून येत असलेल्या दोघा तरुणांमधील मागे बसलेल्या तरुणाने हिसडा मारून दागिना हिसकावला. यानंतर ते चंदगडच्या दिशेने रवाना झाले.  

हद्दपार केलेल्या गुन्हेगाराकडून खंडणीची मागणी  

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगाराने बोंद्रेनगर परिसरात बालिंगा पाडळी या ठिकाणी खंडणी मागून दहशत निर्माण केल्याचा प्रकार चार दिवसांपूर्वी घडला होता. पोलिसांकडून संशयित आरोपी हद्दपार उमेश कोळापटे, तानाजी कोळापटे (रा. बालिंगा पाडळी) यांच्यासह अन्य दोन साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानदेव कबु घुरखे यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर कारवाई करण्यात आली. फिर्यादी घुरखेच्या घरात घुसून उमेशने कानशिलात लगावली आणि दहा हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर तुला सोडणार नाही, असे म्हणून मारहाण केली. तसेच घराचा दरवाजा मोडला. घरातील प्रापंचिक साहित्यही विस्कटले. तसेच सोबत असलेल्यांनीही लाथाबुक्यांनी मारहाण केली.

इतर महत्वाच्या बातम्या 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola