एक्स्प्लोर

Satej Patil : आमदार सतेज पाटील यांना वाढदिवसाची भेट; काँग्रेसकडून आणखी एक जबाबदारी

Satej Patil : राज्यात होणाऱ्या आगमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून स्थापन करण्यात आलेल्या राज्य निवडणूक समन्वय समितीवर सतेज पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

Satej Patil : काँग्रेसचे विधानपरिषदेमधील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांना पक्षाकडून आणखी एक जबाबदारी मिळाली आहे. राज्यात होणाऱ्या आगमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून स्थापन करण्यात आलेल्या राज्य निवडणूक समन्वय समितीवर सतेज पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पाटील यांचा 51 वा वाढदिवस काल 12 एप्रिल रोजी दणक्यात साजरा करण्यात आला. याचदिवशी त्यांना पक्षाकडून आणखी एक संधी मिळाल्याने कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. 

नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली समिती 

निवडणूक समितीमध्ये तीन माजी मुख्यमंत्र्यांसह एकूण 17 सदस्यांचा समावेश आहे. या समितीचे अध्यक्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. अन्य सदस्यांमध्ये बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांचा सहभाग आहे. तसेच नितीन राऊत, यशोमती ठाकूर, नसीम खान, बसवराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, प्रदेश कोषाध्यक्ष अमरजित मनहास, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार आणि प्रमोद मोरे यांचा समावेश आहे.

सव्वा महिन्यात दुसरी जबाबदारी 

यापूर्वी, आमदार सतेज पाटील यांची विधानपरिषदेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी त्यांची नियुक्ती केली होती. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वप्रथम महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवणारे सतेज पाटील काँग्रेसचा चेहरा आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक काँग्रेस आमदार निवडून आणण्यामध्ये त्यांचा सर्वाधिक वाटा आहे.  भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येण्यापूर्वी पहिली जाहीर सभा कोल्हापुरात त्यांच्याच नेतृत्वात पार पडली होती. सतेज पाटील कोल्हापूर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी सातत्यानं प्रयत्नशील आहेत. आघाडी सरकारमध्ये 2010 ते 14 या कालावधीत त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृहराज्यमंत्री, ग्रामविकास, अन्न आणि औषध प्रशासन अशा विविध विभागांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती.

इतर महत्वाच्या बातम्या : 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: लग्नाचा तगादा; अनैतिक संबंधातून वाद, माजी महिला सरपंचाला संपवलं; मृतदेह कारच्या डिकीत टाकून भल्या पहाटे पाहुण्यांच्या घरी पोहोचला, नातेवाईकाने फोन फिरवला अन्....
लग्नाचा तगादा; अनैतिक संबंधातून वाद, माजी महिला सरपंचाला संपवलं; मृतदेह कारच्या डिकीत टाकून भल्या पहाटे पाहुण्यांच्या घरी पोहोचला, नातेवाईकाने फोन फिरवला अन्....
Kolhapur Crime News: म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
काँग्रेसविरुद्ध भाजप रस्त्यावर, राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची, बॅरिकेड्सही ढकलले
काँग्रेसविरुद्ध भाजप रस्त्यावर, राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची, बॅरिकेड्सही ढकलले
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget