P N Patil-Sadolikar : आमदार पी. एन. पाटील यांची प्रकृती स्थिर; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे चिरंजीव राहुल पाटलांकडून आवाहन
करवीरचे काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील राहत्या घरामध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. डोक्यात रक्ताची गाठ तयार झाल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.
कोल्हापूर : आमदार पी एन पाटील (MLA P.N. Patil Health Update) यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी आऊट ऑफ डेंजर आहेत असं म्हणता येणार नाही, अशी माहिती न्युरोसर्जन सुहास बराले यांनी दिली आहे. कालपेक्षा आज प्रकृती बरी आहे, मात्र अजूनही क्रिटिकल आहे असेही डॉक्टर बराले म्हणाले. कोल्हापुरातील करवीर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील राहत्या घरामध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. डोक्यात रक्ताची गाठ तयार झाल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात आमदार पी. एन. पाटील यांच्या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाली. मात्र, या चर्चांमध्ये कुठलेही तथ्य नाही, आमदार पाटील यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टर बराले यांनी दिली.
आमदार पी. एन. पाटील यांच्या दिर्घायुष्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रार्थना करावी
आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनीही रविवारपासून काय घडलं? याची माहिती दिली. ते म्हणाले की, रविवारी सकाळी साडे आठ नऊच्या सुमारास घरी चक्कर येऊन पडले. यानंतर आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. यानंतर मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे लक्षात आले. त्यांना तातडीने आधारमध्ये दाखल केल्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. कालच्या तुलनेत आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे. साहेबांची प्रकृती नाराजी असली, तरी स्थिर आहे. त्यांच्या दिर्घायुष्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रार्थना करावी, असेही आवाहन त्यांनी केले. मुंबईचे प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. सुहास बराले यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार पी. एन. पाटील यांच्यावर उपचार सुरु आहेत.
कोल्हापूर लोकसभेसाठी झंझावाती प्रचार
दरम्यान, कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात असल्याने आमदार पी. एन. पाटील यांनी करवीर मतदारसंघासह जिल्ह्यात झंझावाती प्रचार केला होता. कोल्हापूर लोकसभेला सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक 80 टक्के मतदान झाले होते. करवीर विधानसभा मतदारसंघातून पी. एन. पाटील आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी मतदारसंघातील प्रचाराची धुरा एकहाती सांभाळली होती. लोकसभा निवडणुकीसाठी पी. एन. पाटील यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र, वय आणि प्रकृती लक्षात घेत त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता.
इतर महत्वाच्या बातम्या