Kolhapur News : मोक्का कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेल्या मटकाबुकी सम्राट कोराणेसह त्याच्या साथीदरांना सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लाववल्याने सम्राट कोराणेसह त्याच्या साथीदारांवर अटकेची कारवाई अटळ आहे. सरकारी पक्षाकून ॲड. राजा ठाकरे यांनी न्यायालयात बाजू मांडल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आवश्यक पुरावे आणि कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. 


काय आहे प्रकरण?


तत्कालीन प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पोलिस पथकावर कोल्हापूर शहरातील यादवनगरमध्ये 9 एप्रिल 2019 मध्ये मटकाविरोधात कारवाई करताना प्राणघातक हल्ला झाला होता. त्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनात डीवायएसपी प्रेरणा कट्टे यांनी या प्रकरणी तपास करून राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये संशयित सलीम मुल्लासह 44 जणांवर गुन्हा दाखल केला होता. 


गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये 42 जणांवर अटकेची कारवाईही करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी  संशयितांवर मोक्कातंर्गत कारवाई केली होती. त्यावेळी या प्रकरणातील संशयित कोराणे व पप्पू सावला हे फरार झाल्याने पोलिसांच्या हाती लागले नव्हते. त्यानंतर संशयित सम्राट कोरोणेसह त्याच्या साथीदारांनी मोक्कातंर्गत केलेल्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या