एक्स्प्लोर

Raju Shetti : राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाईन करा; राजू शेट्टी यांची वैद्यमापन नियंत्रकांकडे मागणी

राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाईन करा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि वैद्यमापन नियंत्रक डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांचेकडे केली आहे.

Raju Shetti : राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाईन करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि वैद्यमापन नियंत्रक डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांचेकडे केली आहे. सिंघल यांनी साखर कारखान्यांचे वजनकाटे संगणकीय प्रणाली एकत्र करून तातडीने ऑनलाईन करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले.

राज्यातील साखर कारखान्यांचे सर्व वजन काटे ऑनलाईन करून वजन काट्यांचे कॅलिब्रेशनमध्ये पारदर्शक आणून संगणक प्रणाली एकच ठेवावी, तसेच त्यांचे कॅलिब्रेशन नियंत्रण वैद्यमापन विभागाकडूनच व्हावे, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

दुसरीकडे स्वाभिमानीकडून 7 नोव्हेंबर रोजी पुणे येथील साखर संकुलवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी सिंघल यांची मुंबईत भेट घेत चर्चा केली. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, उसाच्या वजनात मोठ्या प्रमाणात तफावत येत असल्याने शेतकऱ्यांची प्रचंड मोठी लूट सुरू आहे. महाराष्ट्रात सुमारे 35 लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी उसाचे वजन काटे हे विश्वासार्ह व अचूक असणे आवश्यक आहे. वजन काट्यामध्ये पारदर्शकता नसल्याने वजनात मोठी तफावत येते. खासगी काट्यावर वजन केलेला ऊस साखर कारखानदार नाकारत असल्याच्या तक्रारी येतात. शेतकऱ्यांना पावत्या दिल्या जात नाही. त्यासाठी आपण या विषयाकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांच्या या तक्रारीचे गांभीर्य पाहता वैद्यमापन विभागाकडून यावर त्वरीत कार्यवाही होऊन साखर कारखान्यांचे वजन काट्यांच्या कॅलिब्रेशनमध्ये एकसमानता, सुसुत्रता व पारदर्शकता राहण्यासाठी सर्व वजन काट्यांची अॅक्टीव्ह संगणक प्रणाली एकच असणे व त्यांचे कॅलिब्रेशन नियंत्रण वैधमापन विभागाकडून व्हावे, यासाठी तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जयसिंगपूर येथे ऊस  परिषदेत हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वजन काटे ऑनलाईन करणेसाठी एकमुखी ठराव घेण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vivekanand Patil On Raj Thackeray: पुण्यातील MPSC चं आंदोलन स्थगित, राज ठाकरेंनी केला विवेकानंद पाटीलला फोन, म्हणाले...
पुण्यातील MPSC चं आंदोलन स्थगित, राज ठाकरेंनी केला विवेकानंद पाटीलला फोन, म्हणाले...
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Embed widget