Invest In Maharashtra : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची अमेरिकेत व्यापार परिषद
अमेरिकेतील भारतीय उद्योजक गुंतवणूकदार यांनी महाराष्ट्रात संयुक्त उद्योग उभे करावेत यासाठी अमेरिकेतील न्यू जर्सी येथे 11 ते 14 ऑगस्ट या कालावधीमध्ये व्यापार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
Invest In Maharashtra : अमेरिकेतील भारतीय उद्योजक गुंतवणूकदार यांनी महाराष्ट्रात संयुक्त उद्योग उभे करावेत यासाठी अमेरिकेतील न्यू जर्सी येथे 11 ते 14 ऑगस्ट या कालावधीमध्ये व्यापार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या व्यापार परिषदेमध्ये अमेरिकेतीलसुमारे साडेचार हजार भारतीय सहभागी होणार आहेत. या व्यापार परिषदेच्या माध्यमातून राज्यात सुमारे दोन हजार कोटींच्या गुंतवणुकीची शक्यता असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
ललित गांधी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन आम्ही नवीन गुंतवणूक करावी, आधुनिक तंत्रज्ञान पुरवावे, या उद्देशाने व्यापार, उद्योग, सेवा व कृषी उद्योग क्षेत्राची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲग्रीकल्चर आणि अमेरिकेतील महाराष्ट्र लोकांची संस्था बृहन्महाराष्ट्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद होत आहे.
महाराष्ट्र चेंबरचे सध्या विविध 23 देशांशी सामंजस्य करार आहेत. या प्रयत्नांचा पुढील टप्पा म्हणून या व्यापार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महासत्ता असलेला अमेरिका देश तंत्रज्ञान, गुंतवणूक क्षेत्रात जगात आघाडीवर आहे. तेथील आयटी, आर्टिफिशियलसह इंजिनिअरिंग उद्योग राज्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी राज्यातून 50 उद्योजक अमेरिकेला या परिषदेसाठी रवाना होणार आहेत.
यामध्ये ललित गांधी आणि मयांक गुप्ता यांचा सहभाग आहे. अमेरिकेच्या विविध राज्यातील साडेचार हजारांहून अधिक महाराष्ट्रीयन भारतीय तसेच अमेरिकन उद्योजकांनी या परिषदेसाठी उपस्थित राहण्यासाठी नोंदणी केली आहे.