Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कोल्हापुरातून पाठिंबा; आरक्षण 16 टक्के आणि ओबीसीमधूनच घेण्याचा निर्धार

सकल मराठा समाजाकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकस्थळी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाचे शंभरहून अधिक पदाधिकारी या निदर्शनामध्ये सहभागी झाले.

Continues below advertisement

कोल्हापूर : मराठा समाजाला (Maratha Samaj) ओबीसीतून (OBC) आरक्षण मिळावे, सगेसोयरेच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आज (10 जून) त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कोल्हापुरातून (Kolhapur) सकल मराठा समाजाकडून पाठिंबा देण्यात आला आहे. सकल मराठा समाजाकडून आज (10 जून) राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकस्थळी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाचे शंभरहून अधिक पदाधिकारी या निदर्शनामध्ये सहभागी झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी टाळत मुक निदर्शने केली. 

Continues below advertisement

आम्ही आरक्षण 16 टक्के आणि ओबीसीमधूनच घेणार

यावेळी बोलताना बाबा इंदूलकर यांनी आरक्षणासाठी टाळाटाळ होत असल्याने जोरदार टीका केली. ते म्हणाले की, यांना आता अचानक घटनेची आठवण झाली आहे. जे पाया पडत आहेत तेच आरक्षण घालवत आहेत. ज्यांनी 16 टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्यांनीच आता 10 टक्के आरक्षण देत 6 टक्के का कमी केलं? अशी विचारणा बाबा इंदूलकर यांनी केली. याबद्दल ते का बोलत नाहीत? अशीही त्यांनी विचारणा केली. त्यांनी सांगितले की, ज्या कारणासाठी 16 टक्के आरक्षण दिलेल उडालं आहे, त्याच कारणातून हे 10 टक्के आरक्षण उडणार आहे. यांना आरक्षण नको आहे. आम्ही आरक्षण 16 टक्के आणि ओबीसीमधूनच घेणार असल्याचा निर्धार बाबा इंदूलकर यांनी सकल मराठा समाजाकडून व्यक्त केला. 

इतर महत्वाच्या बातम्या

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola