Eknath Shinde stalled plane finally took off : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा जळगाव दौरा पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईला रवाना होण्यासाठी मुंबईला पोहोचले होते. मात्र, विमानतळावर पोहचल्यानंतर तेथील वैमानिकाने विमान उड्डास नकार दिला. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विमान जळगाव विमानतळावर रखडले होते. मात्र, मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांची शिष्टाई फळाला आली असून एकनाथ शिंदे यांचे रखडलेले विमानाने आता उडाले आहे. याबाबतची माहिती गिरीश महाजन यांनी स्वत: दिली आहे.
गिरीश महाजन काय काय म्हणाले?
गिरीश महाजन म्हणाले, त्यांच्या तब्येतीची अडचण होती. तब्येत म्हणण्यापेक्षा त्यांची काही वेळेचीही अडचण असेल. तांत्रिक अडचण होती. पण त्यांच्या कंपनीशी आम्ही बोललो. कंपनीने त्यांच्या भाषेत त्यांना सांगितलं असेल.. विमान आता उडालेलं आहे. पायलटची किरकोळ अडचण होती. मात्र, ती अडचण आता दूर झालेली आहे. विमान आता निघालेलं आहे. एकनाथ शिंदे आता एका तासात मुंबईला पोहोचतील.
पुण्यातील कार्यक्रम आटोपल्यानंतर शिंदेंचा जळगाव दौरा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (दि.5) काँग्रेसला सोलापुरात मोठा धक्का दिला. अक्कलकोट येथील काँग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधू शंकर म्हेत्रे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्वामी समर्थ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर शिंदे आज (दि. 6) दुपारी पुण्यातील मेट्रो 2025-27 च्या नवनिर्वाचित समितीची सर्वसाधारण सभा व पदस्थापना समारंभास उपस्थित राहिले. पुण्यातील हा समारंभ आटोपल्यानंतर ते जळगावला रवाना झाले होते.
आषाढी एकादशीला पंढरीच्या दर्शनासाठी संतश्रेष्ठ मुक्ताईंची पालखी आज पंढरपूराकडे मार्गस्थ झाली. या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे श्री संत मुक्ताईंचे भक्तिभावाने दर्शन घेतले. तसेच पालखीतील प्रतिमा आणि पादुकांचे मनोभावे दर्शन घेत पालखीचा खांदेकरी होऊन या वारीत सहभागी झाले. मात्र, येताना तांत्रिक अडचण आल्याने त्यांचे विमान रखडल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) या दोन्ही मंत्र्यांनी विमान कंपनीशी संवाद साधल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे विमान उडालेले पाहायला मिळाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी : पायलटचा विमान उड्डाण करण्यास नकार, एकनाथ शिंदेंचे विमान जळगाव विमानतळावर रखडले
भर पावसात गौतमी पाटीलचा मोहात पाडणारा डान्स, अलका यागनिक यांच्या गाण्यावर थिरकली VIDEO
