कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या धुवाँधार पावसाने सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 84 बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. रविवारी संथगतीने पाण्यात वाढ झाल्यानंतर आज (22 जुलै) पहाटेपासून पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरु झाली आहे. पंचगंगा नदी 39 फूट 1 इंचांवरून वाहत असून इशारा पातळी गाठली आहे. धोका पातळी 43 फूट आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वदूर संततधार सुरु असल्याने वाहतुकीवर विपरित परिणाम झाला असून रस्तेही ओस पडत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्व नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोल्हापूर शहरात काही भागांमध्ये पुराचे पाणी येऊ लागल्याने कुटुंबांना स्थलांतरित केलं जात आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली गेले असून कुंभी, कासारी नद्यांना सुद्धा पूर आला आहे. जिल्ह्यातील 8 राज्यमार्ग बंद आहेत. 16 प्र. जि. मार्ग बंद आहेत, तर इतर जिल्हा मार्ग 6 बंद आहेत. 14 ग्रामीण मार्गही बंद असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर, शाहूवाडी तालुक्यात मलकापूर शेजारी, जाधववाडी येथे 2 फूट पाणी आल्याने NHAI कडून महामार्ग बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाने अणुस्कुरा घाटातून वाहतूक सुरु होती. मात्र, तो मार्ग सुद्धा वरनमळीमध्ये बंद झाला आहे. 


जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा


पाणीपातळी तारीख- 22/07/2024 : (वेळ  सकाळी 9 वाजता)


(धोका पातळी/आत्ताची पातळी)


पंचगंगा नदी


राजाराम - ५४३.२९m / 542.02m
सुर्वे - ५४३.६२m / 539.28 m 
रुई - ५३९.५०m / 538.49 m
इचलकरंजी - ५३९.९८m /537.35 m
तेरवाड - ५४०.५५m / 535.1 m
शिरोळ - ५४२.०७m / 533.8 m
नृसिंहवाडी - ५३९.००m/532.62 m


भोगावती नदी


बालिंगा - ५४६.३० m / 544.41 m


कासारी नदी


नीटवडे - ५४४.००m / 543.48m


वारणा नदी


शिगाव - ५४६.००m /544.48m


दुधगंगा नदी


कागल हायवे - ५४१.९१m /538.30 m


वेदगंगा नदी


बाणगे पूल - ७.५०m / 6.50 m


हिरण्यकेशी नदी


भडगाव पूल - ७.५०m/ 5.30 m


घटप्रभा नदी


हिंडगाव बंधारा - ७.०० m / 6.60 m


ताम्रपर्णी नदी


कोवाड बंधारा - ६.५०m / 5.30 m


जिल्ह्यातील कोणते बंधारे पाण्यात?



  • पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी

  • ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे, कोवाड, माणगांव, ढोलगरवाडी  व जंगमहट्टी. 

  • वेदगंगा नदीवरील- म्हसवे, शेणगाव, गारगोटी, निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली व करडवाडी 

  • हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव, विलजी, ऐनापूर, गिजवणे, जरळी व हरळी

  • दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिध्दनेर्ली, सुळकूड व बाचणी. 

  • कडवी नदीवरील- भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव, सवते  सावर्डे व सरुड पाटणे

  • वारणा नदीवरील -चिंचोली, तांदूळवाडी, कोडोली, माणगाव, खोची व शिगाव. 

  • भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व शिरगाव. 

  • कुंभी नदीवरील- कळे, शेनवडे, मांडुकली व वेतवडे

  • कासारी नदीवरील- येवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली, बाजार भोगाव,पेंडाखळे, करंजफेण, कुंभेवाडी, सुसकेवाडी, नवलाचीवाडी-1 व नवलाचीवाडी-2 

  • धामणी नदीवरील- सुळे, पनोरे व आंबर्डे  घटप्रभा नदीवरील- हिंडगाव, कानडे-सावर्डे, आडकुर, तारेवाडी, कानडेवाडी, बिजूर भोगोली व पिळणी. 

  • तुळशी नदीवरील – बीड असे एकूण 81 बंधारे पाण्याखाली आहेत. 





इतर महत्वाच्या बातम्या