Kolhapur Rain Update: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यावर पुन्हा एकदा पुराची टांगती तलवार निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून कोणत्याही प्रकारचा विसर्ग सुरू नसतानाही पंचगंगा नदी इशारा पातळीवर पोहोचली आहे. आज राधानगरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने पाणी पातळीत वाढ होऊन पंचगंगा नदी धोका पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याने 2019 आणि 2021असे दोन दोन प्रचंड महापूर अनुभवल्याने पंचगंगेची पाणी पातळी वाढू लागल्यानंतर शहरातील कोणता भाग पाण्यात जातो, याबाबत प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्राधान्याने बाधित होणाऱ्या जिल्ह्यातील गावांची यादीही जाहीर केली आहे. दुसरीकडे, अलमट्टी धरणातून विसर्ग सुरु करण्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. 


पंचगंगा नदी किती फुटावर पोहोचल्यानंतर कोल्हापूर शहरातील कोणता भाग पाण्याखाली जातो?



  • 43 फूट : सुतारवाडा

  • 45 फूट : जुन्या शिये नाका ओडयावर पाणी येऊन बावडा रस्ता बंद

  • 45 फूट : रिलायन्स मॉल पिछाडीस कुंभार गल्ली, कामगार चाळ, कांदा बटाटा मार्केट शाहपूरी

  • 46 फूट 5 इंच : व्हीनस कॉर्नर, व्हीनस टॉकीज ते बर्फ फॅक्टरी रस्ता बंद, नाईक मळा, पोलो ग्राऊंड 

  • 47 फूट 2 इंच : पंचगंगा हॉस्पिटल, जामदार क्लव, शुक्रवार पेठ पश्चिम बाजू

  • 47 फूट 2 इंच : आयडीयल कॉलनी लक्षतीर्थ वसाहत, सुतार मळा व शिंगणापूर रस्ता बंद 

  • 47 फूट 4 इंच : शाहुपूरी कुंभार गल्ली, मुक्त सैनिक वसाहत, काटे मळा, यशोधा पार्क, मलयगिरी अपार्टमेंट, जाधववाडी, बावट कॅम्प, कपूर वसाहत पाणी येते.

  • 47 फूट 5 इंच : रेणुका मंदीर, गुंजन हॉटेल, त्रिबाली नगर, रेणुका नगर, घाडगे गृहयोग व रेणुका मंदीर पिछाडीस पाणी येते. माळी मळा, मेडीकल कॉलेज बावडा, उलपे मळा, रमण मळा, जावडेकर इमारत, नाईक मळा पॅलेस पिछाडीस, राजहंस प्रिंटीग प्रेस, हरीपुजापुरम.



  • > त्रिकाणी बाग ते महावीर कॉलेज रस्ता बंद.

  • > केव्हीज पार्क, दिप्ती पार्क, डायमंड हॉस्पीटल, अंतरंग हॉस्पीटल.

  • > खानविलकर पेट्रोल पंप ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता बंद.

  • > जिल्हाधिकारी कार्यालय ते महावीर कॉलेज व्हाया पाटलाचा वाडा रस्ता बंद. 

  • > बसंत बहार ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता बंद

  • > भालजी पेंडारकर हॉल परिसर (महावीर गार्डन दक्षिण बाजू).

  • > दसरा चौक ते व्हीनस कॉर्नर रस्ता बंद.

  • > दुर्गा मंदीर ( लक्षतीर्थ वसाहत)



  • 47 फूट 5 इंच : विल्सन पूल ते व्हीनस कॉर्नर रस्ता बंद 

  • 47 फूट 7 इंच : सुभाष रोड (टायटन शोरुम ते फोर्ड कॉर्नर) रस्ता बंद.

  • 47 फूट 8 इंच : पिनाक, सनसिटी, माळी मळा, महावीर कॉलेज पिछाडीस, पोलो ग्राऊंड, जावडेकर अपार्टपेंट, ड्रिम वर्डची मागील बाजूस.



  • > लक्ष्मीपूरी ते नाईक अँड नाईक कंपनी रस्ता बंद 

  • > गवत मंडई रस्त्याची पश्चिम बाजू पाण्यात..



  • 48 फूट : मुक्त सैनिक रिक्षा स्टॉप ते मलयगिरी रस्ता बंद. 



  • काटे मळा ते सफायर पार्क रस्ता बंद.

  • मेनन बंगला ते शेळकेसी नगरसेवक घरासमोरील रस्ता बंद.



  • 48 फूट 8 इंच : शंकराचार्य मठ, पंचगंगाग तालीम (जामदार क्लब ते पंचगंगा हॉस्पीटल रस्त्याची पश्चिम बाजू पुर्ण पाण्यात )



  • >उषा टॉकीज (बी न्यूज ऑफिस ते व्हीनस कॉर्नर रस्ता बंद (स्टेशन रोड) 



  • 49 फूट 11 इंच : घोडकेवाडी, मुक्त सैनिक वसाहत पूर्व बाजू, एम.एस.ई.बी. बापट कॅम्प, कदमवाडी, गणेश पार्क

  • 51 फूट : दुधाळी (कोल्हापूर ऑर्थोपेडीक सेंटर, महाराणा प्रताप हायस्कुल) उत्तरेश्वर गवत मंडई नाका, दुधाळी ग्राउंड परीसर

  • 51 फूट 8 इंच : कोल्हापूर कमान ते टोल नाका रस्ता बंद

  • 53 फूट : बसंत बहार ते जिल्हाधिकारी कार्यालय पूर्व भाग पाण्यात. (जिल्हाधिकारी कार्यालय पिछाडीस उमेदपुरी)

  • 55 फूट 7 इंच : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अंदाजे 3 ते 4 फूट पाणी होते व जिल्हाधिकारी कार्यालय समोरील भाग (नागाळा पार्क) पुराचे पाणी आले होते.



दुसरीकडे, पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राधानगरी कुंभी, तुळशी, कासारी धरणातून पाणी पंचगंगा नदीमध्ये येत असते. राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरामध्ये पाणी पोहोचण्यासाठी 15 तास लागतात. त्यामुळे आज दिवसभरात पाऊस जरी नाही झाला तरी साधारणपणे नदीची पाणीपातळी 44 फूटापर्यंत जाऊ शकते.


घराच्या दारापर्यंत पाणी येण्याची वाट पाहू नये. कारण त्यानंतर स्थलांतर करणे अवघड होऊन जाते. निवारागृहात महिला आणि पुरुषांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. घर सोडल्यानंतर पोलीस कर्मचारी घराचं संरक्षण करतील, असे त्यांनी सांगितले. काल 27 शाळा आणि आज कोल्हापूर शहरातील सर्व शाळांना सुट्टी दिली आहे. मुलं शाळेत गेल्यानंतर पालक स्थलांतरित होण्यास तयार होत नाहीत, त्यामुळे कोल्हापूर शहरातील शाळांना सुट्टी दिली असल्याचे रेखावार म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या :