एक्स्प्लोर

Kolhapur Rain Update : कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पावसाचा तडाखा; कागल, गडहिंग्लज तालुक्यात मुसळधार, बर्की बंधाऱ्यावरून अवजड वाहतूक बंद

Kolhapur Rain Update: शिये, कसबा बावडा परिसरात अचानक ढगफुटीसदृश पाऊस सुरु झाला. त्यामुळे सर्वत्र काहीच वेळात पाणीच पाणी झाले. शिये गावात छत्रपती शिवाजी महाराज चौकातही पाणी जोरदार वाहू लागले.

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) शहरासह जिल्ह्यात (Kolhapur Rain Update) परतीचा पावसाने तडाखा दिला. जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून दमदार परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर शहरातील कसबा बावडा, शिये परिसराला ढगफुटीसदृश पावसाने तडाखा  दिला. कोल्हापूर शहर, गांधीनगर परिसरातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. बुधवारी सायंकाळी शिये, कसबा बावडा परिसरात अचानक ढगफुटीसदृश पाऊस सुरु झाला. त्यामुळे सर्वत्र काहीच वेळात पाणीच पाणी झाले. शिये गावात छत्रपती शिवाजी महाराज चौकातही पाणी जोरदार वाहू लागले. स्टेट बँकेच्या शाखेतही पाणी साचले. पावसाळ्यात जेवढे पाणी आले नाही ते केवळ तासाभराच्या पावसात आल्याने ग्रामस्थांची धावपळ उडाली. 

कसबा बावडा परिसरातही हजेरी 

शियेला लागून असलेल्या कसबा बावड्यातही ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. कोल्हापूर शहर, उपनगरांमध्येही पाऊस झाला. खड्ड्यातील रस्त्यांमुळे वाहनधारकांची चांगलीच कसरत झाली. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. 

कागलमध्येही जोरदार पाऊस 

दुसरीकडे, कागल शहरातही (Kagal Rain) जोरदार पाऊस झाला. जवळपास एक तास सरी कोसळल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. 

गडहिंग्लजमध्येही पाऊस 

गडहिंग्लजमध्येही (Gadhinglaj) ठिकठिकाणी पाऊस कोसळला. जोरदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. खरीप हंगामातील भात, सोयाबीन, भुईमूग या पिकांना गेल्या आठवड्यातील व आजच्या पावसाने दिलासा मिळाला. भात पिकाला दिलासा असला, तरी सोयाबीन काढणीला आले आहे. मळणीलाही काही ठिकाणी प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे सोयाबीन अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

बर्की बंधाऱ्यावरून अवजड वाहतूक बंद

दरम्यान, शाहूवाडी तालुक्यातील बर्की येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचा पिलर कोसळल्याने मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. बर्की फाटा ते बर्की गावाला जोडणाऱ्या या बंधाऱ्यावरून बर्की, बुराणवाडी, कोटकरवाडी या गावांतून वाहतूक होते. बर्की धबधब्याकडे भेट देणारे पर्यटक याच मार्गावरून येतात. काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने कासारी नदी दुथडी भरून वाहिली व पाण्याचा जोर वाढल्याने या बंधाऱ्याचा पिलर वाहून गेला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावरून वाहतूक धोकादायक आहे. पादचारी व दुचाकी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे बर्की ग्रामस्थ व पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

दाजीपुरात ढगफुटीसदृश पाऊस

दुसरीकडे, मंगळवारी पावसाचे आगार असलेल्या राधानगरी तालुक्यातील दाजीपुरात केवळ पाच तासांत तब्बल 137 मिलिमीटर पाऊस कोसळला. ढगफुटीसदृश पावसाने पाणीच पाणी झाले. कुंभी, कासारी लघु पाटबंधारे परिसरातही अतिवृष्टी झाली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget