Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगूडमधील डाॅक्टरचा किळसवाणा प्रकार ताजा असतानाच आणखी एका विकृत डाॅक्टरचा कारनामा समोर आला आहे. महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत विवस्त्र व्हिडिओ करण्याचा प्रकार घडला. महिला पीडिताने तक्रार दिल्यानंतर डॉ. प्रशांत लक्ष्मण कनुजे या संशयिताविरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेला डाॅक्टर शिरोळ तालुक्यामधील आहे. 


पीडीतेचे अश्लील फोटो व व्हिडीओ तयार करण्याचा प्रकार


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार विवाहितेच्या आर्थिक असहाय्यतेचा गैरफायदा घेत शिरोळ तालुक्यातील एका डॉक्टराने तिला गोकुळ शिरगाव (ता करवीर) येथील एका हॉटेलमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर पीडितेचे अश्लील फोटो व व्हिडीओ तयार करण्याचा प्रकार घडला. त्यामुळे पीडितेकडून पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. परिस्थितीचा गैरफायदा घेत डॉक्टरने सर्व आर्थिक गरजा पूर्ण करण्याचे आमिष दाखवले होते. तसेच 2019 पासून वारंवार एका हॉटेलवर नेऊन लैगिक अत्याचार केले. 7 एप्रिल रोजी पीडितेच्या राहत्या घरी जाऊन डाॅक्टरने तू भेटायला ये म्हणत शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. याबाबतची फिर्याद पीडितेने गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिली. 


'त्या' अश्‍लील चित्रफितप्रकरणी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल


दुसरीकडे, कागल तालुक्यातील मुरगुडमध्ये बोगस डॉक्टरविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित डॉ. दत्तात्रय शामराव कदम आणि काही अज्ञातांविरुद्ध अश्‍लील चाळे प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. मुरगूड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास बडवे हे या प्रकरणातील फिर्यादी आहेत. शहरातील निनावी पत्रे विविध माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या बातम्या तसेच निनावी पत्रातून होत असलेल्या चित्रीकरणाची चर्चा, डॉ. कदमचे नग्न स्वरुपातील फोटोंच्या प्रसारित झालेल्या झेरॉक्स प्रती या पार्श्वभूमीवर योग्य तो तपास होण्यासाठी पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी फिर्याद दाखल केली आहे. अश्‍लील व्हिडीओ तयार करून चित्रफिती तसेच त्या चित्रफितींवरून छायाचित्रे बनवून त्याच्या झेरॉक्स प्रती काढून प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


अश्लील चित्रफिती व्हायरल झाल्यानंतर शहरातील वातावरण गढूळ बनल्याने या प्रकरणाची शहर परिसरात चर्चा होती. यानंतर या प्रकरणाची महिला आयोगाकडून शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांना भेटून संशयिताला अटक करण्याची मागणी केली होती.


इतर महत्वाच्या बातम्या