Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) इचलकरंजी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. आंबटकर गेल्या 18 दिवसांपासून मृत्यूशी दिलेली झुंज अपयशी ठरली आहे. न्यायाधीश आर. एन. आंबटकर (R. N. Ambatkar) यांचे उपचार सुरु असताना शुक्रवारी (7 एप्रिल) निधन झाले. 21 मार्च रोजी जेवण झाल्यानंतर शतपावली करताना यड्राव फाटा या ठिकाणी एका दुचाकीस्वाराने आंबटकर यांना मागून भीषण धडक दिली. यामध्ये आंबटकर गंभीर जखमी झाले होते. या अपघातानंतर त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात गेल्या 18 दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र काल त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. आंबटकर यांच्या निधनाने इचलकरंजीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या मूळ गावी व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली. 


अपघात की घातपात? कोल्हापूर पोलिसांकडून तपास सुरु


कोल्हापूर पोलिसांकडून हा अपघात आहे की घातपात या दिशेने सूक्ष्म तपास सुरु आहे. ज्या दुचाकीस्वाराने न्यायाधीश आंबटकर यांना धडक दिली त्याची पोलीस सखोल चौकशी करत आहेत. आंबटकर मूळचे पुणे जिल्ह्यातील मंचरमधील होते. जून 2022 मध्ये त्यांची इचलकरंजीमध्ये न्यायाधीश म्हणून रुजू झाले होते. 


21 मार्च रोजी काय घडले होते?


न्यायाधीश आंबटकर यड्रावमधील पार्वती मंदिराजवळ राहत होते. मंगळवारी 21 मार्च रोजी संध्याकाळी जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे शतपावली करण्यासाठी बाहेर पडले होते. शतपावली करत असतानाच अनिल रामचंद्र जाधवच्या (रा. जांभळी) (MH-09-DD-9645) दुचाकीने पाठीमागून धडक दिली होती. या धडकेत आंबटकर अत्यंत गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना पहिल्यांदा इचलकरंजी आणि नंतर कोल्हापुरात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 


उपचारासाठी डाॅक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न 


कोल्हापुरात त्यांच्यावर डाॅक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली होती. उपचार सुरु असतानाच आठ दिवसांपूर्वी ब्रेन डेड झाला होता. अशा परिस्थितीमध्ये डाॅक्टरांकडून उपचाराचे प्रयत्न सुरु होते, पण आंबटकर यांची शुक्रवारी प्राणज्योत माववली.  


इतर महत्वाच्या बातम्या