Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगुडमध्ये बोगस डॉक्टरविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित डॉ. दत्तात्रय शामराव कदम आणि काही अज्ञातांविरुद्ध अश्‍लील चाळे प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. मुरगूड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास बडवे हे या प्रकरणातील फिर्यादी आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील निनावी पत्रे विविध माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या बातम्या तसेच निनावी पत्रातून होत असलेल्या चित्रीकरणाची चर्चा, डॉ. कदमचे नग्न स्वरुपातील फोटोंच्या प्रसारित झालेल्या झेरॉक्स प्रती या पार्श्वभूमीवर योग्य तो तपास होण्यासाठी पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी फिर्याद दाखल केली आहे. अश्‍लील व्हिडीओ तयार करून चित्रफिती तसेच त्या चित्रफितींवरून छायाचित्रे बनवून त्याच्या झेरॉक्स प्रती काढून प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


अश्लील चित्रफिती व्हायरल झाल्यानंतर शहरातील वातावरण गढूळ बनल्याने या प्रकरणाची शहर परिसरात चर्चा होती. यानंतर या प्रकरणाची महिला आयोगाकडून शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांना भेटून संशयिताला अटक करण्याची मागणी केली होती. संशयितांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, चित्रफित व्हायरल करणाऱ्यालाही ताब्यात घेऊन पोलिसांनी सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी शहरातील नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. त्यानंतर आता पोलिसांनी गंभीर दखल घेतली होती. 


व्हायरल निनावी पत्रात काय म्हटले होते? 


'मुरगुडचे नाव आता वेगळ्या कारणासाठी गाजत आहे. येथील बोगस डॉक्टरने आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या अश्लील चाळ्यांचे चित्रण करून मुरगुडीचे नाव बदनाम केलं आहे. डॉक्टर हा पेशंटच्या दृष्टीने देव माणूस असतो. परंतु, या बोगस डॉक्टरने आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या आडून हा गैरप्रकार करून या व्यवसायात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात कलंक लावला आहे.'


'ही अवलाद आपल्या मुरगुडच्या भावी पिढीसाठी घातक आहे. सर्व देश महिला दिन साजरा करत महिलांचा सन्मान करून त्यांच्या मनात सुरक्षितेची भावना निर्माण करत आहे. त्यामुळे आपल्या मुरगुडमध्ये महिला सुरक्षित नाहीत असा संदेश या घटनेमधून जात आहे. अशा प्रकारचे अश्लील चाळे चित्रण करून ते जतन करून ठेवणाऱ्या विकृत अप्रवृत्तीस आपण सर्व मुरगुडकर कायमचा धडा शिकवूया. जेणेकरून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा घटना आपल्या मुरगुडमध्ये होणार नाहीत याची खबरदारी आपल्यावर आहे. या बोगस डॉक्टरला पाठबळ देणाऱ्यांचा सुद्धा आपण सर्वजण कायमस्वरूपी बंदोबस्त करून मुरगूड शहरात महिला सुरक्षित आहेत असा संदेश सगळे पाठवूया.ट  


इतर महत्वाच्या बातम्या