Rajaram Sakhar Karkhana : राजाराम साखर कारखान्याच्या विरोधी गटातील 29 अवैध उमेदवारांच्या याचिकेवरील निर्णय प्रादेशिक साखर सहसंचालकांनी दिलेला निकाल मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला. यानंतर राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आले. यामध्ये 16 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विरोधी आघाडीकडून 'आमचं ठरलंय, कंडका पाडायचा, उसाला दर मिळवायचा' ही टॅगलाईन आता प्रचारात दिसेल. 29 उमेदवार अवैध ठरल्याने बरेच नवीन चेहऱ्यांना संधी विरोधी आघाडीकडून मिळाली आहे. 


विरोधी आघाडीचे उमदेवार


व्यक्ती उत्पादक सभासद गट क्रमांक 1 



  • शालन बाबूराव बेनाडे 

  • किरण बाबासाहेब भोसले 


गट क्रमांक 2 



  • शिवाजी ज्ञानू किबिले 

  • अभिजित सर्जेराव माने 

  • दिलीप गणपतराव पाटील


गट क्रमांक 3 



  • विलास शंकर पाटील

  • विठ्ठल हिंदुराव माने 

  • बळवंत रामचंद्र गायकवाड 


गट क्रमांक 4 



  • दिनकर भिवा पाटील 

  • सुरेश भिवा पाटील

  • संभाजी शंकरराव पाटील


गट क्रमांक 5 



  • विजयमाला विश्‍वास नेजदार-माने 

  • मोहन रामचंद्र सालपे


गट क्रमांक 6 



  • दगडू मारुती चौगले

  • शांताराम पांडुरंग पाटील 


महिला राखीव प्रतिनिधी



  • पुतळाबाई मारुती मगदूम

  • निर्मला जयवंत पाटील


अनुसूचित जाती-जमाती



  • बाबासाहेब थळोजी देशमुख 


इतर मागास प्रतिनिधी



  • मानसिंग दत्तू खोत 


भटक्या विमुक्त जाती



  • अण्णा विठू रामाण्णा 


संस्था गट प्रतिनिधी 



  • सचिन नरसगोंडा पाटील 


उच्च न्यायालयाने अपील फेटाळले 


राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विरोधी आघाडीमधील 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवल्यानंतर विरोधी गटाने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे धाव घेतली होती. सहसंचालकांनी सुद्धा निकाल देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय कायम केला. यामुळे मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर कारखान्याच्या पोटनियमांचा विचार करुन निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहसंचालकांनी दिलेला निर्णय उच्च न्यायालयानेही कायम ठेवला.  


सत्तारूढकडून 14 विद्यमान संचालकांना संधी नाकारली 



दरम्यान, राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाने 14 विद्यमान संचालकांना नारळ दिला आहे. विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह पाच संचालकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक हे स्वतः संस्था गटातून रिंगणात आहेत. राजाराम साखर कारखान्याच्या (Rajaram Sakhar Karkhana) पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्तारुढ महाडिक गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आले. राजाराम कारखाना कार्यस्थळावर सत्तारुढ छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. 


इतर महत्वाच्या बातम्या :