(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर खड्ड्यात; शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना शिस्तभंगाची नोटीस, तीन अभियंत्यांवर दंडाची कारवाई
कोल्हापूर शहरातील (kolhapur municipal corporation) रस्त्यांची वाताहत झाली असल्याने चौफेर टीका मनपा प्रशासनावर होत आहे. मनपा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.
Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर शहरातील (kolhapur municipal corporation) रस्त्यांची वाताहत झाली असल्याने चौफेर टीका मनपा प्रशासनावर होत आहे. मनपा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे (kadambari balkawade) यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना नोटीस बजावून रस्ते कामाचा हिशेब मागितला असून पाच दिवसांत संपूर्ण रस्ते कामांचा स्पष्ट अहवाल न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
रस्त्यांच्या कामात दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत तीन विभागीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. काल काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आल्यानंतर मनपा प्रशासकांनी कडक भूमिका घेतली आहे. कोल्हापुरातील रस्त्यांमुळे महापालिकेची पुरती नाचक्की झाली आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या प्रशसकांनी पहिल्यांदा ठेकेदारांना दणका दिल्यानंतर आता अधिकाऱ्यांची झाडाझडती सुरु केली आहे.
दरम्यान, गांधी मैदान विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता एन. एस. पाटील, छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता नारायण भोसले यांना प्रत्येकी एक हजाराचा दंड केला आहे. राजारामपुरी विभागीय कार्यालयाचे निवृत्त उपशहर अभियंता बाबूराव दबडे यांना पाच हजाराचा दंड करण्यात आला आहे. या सर्वांनी रस्ते कामाच्या नियोजनात तसेच अंमलबजावणीत दुर्लक्ष केल्याबद्दल कारवाई केली आहे. यानंतरही सुधारणा झाली नसल्यास शिस्तभंग कारवाईचा इशाराही दिला आहे.
ठेकेदारांच्या मनमानीला कोल्हापूर मनपा आयुक्तांकडून चाप
यापूर्वी, कोल्हापूर शहरातील सुरु असलेल्या कामात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत ठेकेदारांवर मनपा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे (kadambari balkawade) यांनी दंडाची कारवाई करत दणका दिला आहे. ठरवून दिलेल्या मुदतीत काम चालू केले नसल्याने ठेकेदार शैलेश भोसलेला 24 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. महापालिकेकडील 119 कामासाठी 39 ठेकेदारांना विहित मुदतीत काम चालू केले नसलेने त्यांनाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दोन आरोग्य निरीक्षकांवरही दैनंदिन काम जबाबदारीने न केल्याने दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
ठेकेदार भोसलेच्या कामातील दिरंगाईबद्दल विलंब आकार म्हणून 24 हजार दंडाची शिक्षा करण्यात आली. महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रंमांक 2 छत्रपती शिवाजी मार्केट अंतर्गत प्रभाग क्रमांक 33 महालक्ष्मी मंदीर या प्रभागातील जामदार वाडा मोमीन ग्लास सेंटर, सोडा कॉर्नर, ताईबाई गल्ली, शायरन फुटबॉल ग्रुप, डॉ. पाटील बोळ घर ते शिंदे घर या परिसरात गटर व पॅसेज काँक्रिटीकरण करणेचे काम ठेकेदार शैलेश भोसलेला देण्यात आले होते.
इतर महत्वाच्या बातम्या