कोल्हापूर: कोल्हापूर (Kolhapur News)  जिल्ह्यात 2019 साली पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातले सर्व नद्या, नाले, ओढे तुडुंब भरले असून हे पाणी सखल भागात साचत असल्याने शेकडो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवावं लागत आहे. नदीचं पाणी शहरातल्या अनेक भागात घुसले. पंचगंगा नदीनं (Panchganga River) पात्र सोडून शहराकडे धाव घेतली आणि पुढे सगळा हलकल्लोळ माजला. मात्र, पंचगंगा पात्र का सोडतेय? याचं कारण आता समोर आले आहे.


कोल्हापूरची पंचगंगा 2019  पात्र सोडून बाहेर आली. निम्मं कोल्हापूर पंचगंगेत सामावलं. हजारो लोक बेघर झाले, शेकडो जनावरं दगावली  दोन आठवडे कोल्हापूर जगापासून तुटलं. देवापासून भक्तापर्यंत सगळेच ओलीस धरले गेले. पण हे सगळं झालं अतिपावसामुळं? की पंचगंगेच्या मार्गात आलेल्या या महामार्गानं? की माणसानंच तयार केलेल्या धरणानं?  हा प्रश्न उपस्थित होत आहे. 


नदीच्या विस्तारणाऱ्या पात्रात भराव


पंचगंगा नदी कोल्हापूर शहराला वळसा घालून  पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेने वाहत जाते. त्याच पंचगंगेवरुन उत्तर-दक्षिण असा जाणारा महामार्ग बांधला गेला आहे.प ण तो बांधत असताना नदीच्या विस्तारणाऱ्या पात्रात  भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे हा रस्ता नकळतपणे पंचगंगेचं पाणी अडवतो त्यामुळे फुगवटा निर्माण होतोय आणि पुन्हा कोल्हापूर पुरात जात आहे.


प्रदूषीत नद्यांमध्ये कोल्हापुरातील पंचगंगा


 दरम्यान पंचगंगा नदीच्या पाण्यावर लाखो मृत मासे तरंग असल्याचे दिसते. कोल्हापूर शहराच्या नजीक प्रत्येक बंधाऱ्यावर कमी अधिक प्रमाणात असेच चित्र पाहायला मिळते. पंचगंगा इतकी प्रदूषीत झाली असल्याने मासे आपला जीव वाचवण्यासाठी तडफडू लागल्याचे दिसते. या भागातले साखर कारखाने, रासायनिक प्रक्रिया करणारे उद्योग, शहर आणि मोठ्या गावातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत सोडलं जातं. त्याचंच परिणाम या नदीला जलचरांवर झाला असल्याचे बोलले जात आहे.  पंचगंगा नदीची ही अवस्था काही 1- 2 वर्षात झालेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पंचगंगा प्रदूषण मुद्दा गाजत आहे. साखर कारखानदार असो किंवा छोटे उद्योग करणारे असो, त्यांनी जर ठरवलं तर पंचगंगा प्रदूषण मुक्त होऊ शकते. हे लॉकडाऊनच्या दरम्यान स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पंचगंगा प्रदूषित करण्यास जबाबदार असणाऱ्या घटकांनी विचार करण्याची वेळ आली आहे. शिवाय डोळ्यावर पट्टी बांधून काम करणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील याकडे गांभीर्याने पहावं लागणार आहे.


हे ही वाचा :