Kolhapur Nagarpalika Election 2022 : ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात घोषित करण्यात आलेल्या निवडणुकींना स्थगिती देण्यात आली होती. आता पुढे ढकलण्यात आलेल्या नगरपरिषदांमध्येही थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणूक होणार आहे. राज्यातील 92 नगरपरिषदा, 4 नगर पंचायतीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे.
त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 6 नगरपालिकांना थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाईल. निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आलेल्या नगरपालिकांमध्ये जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, वडगाव, मुरगूड आणि कुरूंदवाड या 6 नगरपालिकांचा समावेश आहे. ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने लवकरच या निवडणूक होतील अशी चिन्हे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणावर निर्णय देताना निवडणूका दोन आठवड्यात घेण्यास सांगितले होते.
शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी ठाकरे सरकारचा निर्णय फिरवताना पुन्हा एकदा नगराध्यक्ष आणि सरपंच निवडीबाबत मोठा निर्णय घेतला. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. शिवाय ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे.
शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या निर्णयांना केराची टोपली दाखवण्याचा सपाटा सुरुच आहे. ठाकरे सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय शिंदे सरकारकडून बदलला जात आहे.
तत्कालिन फडणवीस सरकारकडून थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि सरपंच निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर हे निर्णय बदलण्यात आले. नगरपरिषद, नगरपंचायतीमधील सदस्य विरोधी पक्षांचे आणि नगराध्यक्ष इतर पक्षांचा असल्यामुळे विकासकामांबाबत निर्णय घेण्यात अडचणी येत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर थेट निवडणूक रद्द करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा राज्यात थेट पद्धतीनं नगराध्यक्ष निवडला जाणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Satej Patil on Sanjay Mandlik : सतेज पाटील म्हणाले, खासदार संजय मंडलिकांनी घेतलेला निर्णय दुःख देणारा, पण जिल्ह्याच्या राजकारणात..
- Kolhapur Crime : कोल्हापूरच्या अवघ्या दहावी पास रियाजने आमदारांना मंत्रिपदासाठी 100 कोटींचा चुना लावण्याचा बेत रचला!
- Hasan Mushrif : वेळ आल्यास लोकसभेला शड्डू ठोकणार का? विचारताच हसन मुश्रीफ काय म्हणाले?
- Dhairyashil Mane : जिथं सत्ता तिथं राजकीय निष्ठा! खासदार धैर्यशील मानेंच्या राजकीय प्रवासाचा थाटच न्यारा
- Sanjay Mandlik : बंटी पाटलांच्या ताकदीने विजयी गुलाल उधळला अन् आता शिंदे गटात, जाणून घ्या खासदार संजय मंडलिकांची राजकीय कारकिर्द
- Sanjay Pawar : कोल्हापूरच्या दोन्ही शिवसेना खासदारांची बंडखोरी, जिल्हाप्रमुख संजय पवार यांना अश्रू अनावर