एक्स्प्लोर

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात गव्यांचा धुडगूस सुरुच, आजऱ्यात महिला जखमी; भुदरगड तालुक्यात तब्बल 25 गव्यांच्या कळपाचे दर्शन

शालन या शेतात ऊस भांगलण करण्यासाठी गेल्या होत्या. हिरण्यकेशी नदी पार करून गव्यांचा कळप ऊसात शिरला. गव्यांचा कळपाचा मोठा आवाज आल्याने भांगलणीसाठी आलेल्या महिलांनी शेतातून पळ काढला.

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात दुर्गम तालुक्यांमध्ये गव्यांचा उच्छाद सुरुच आहे. आजरा तालुक्यात ऊसाच्या शेतात भांगलणीसाठी केलेल्या महिलेवर गव्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाली. पेरणोलीत झालेल्या घटनेत शालन विष्णून दारूडकर (वय 48) या जखमी झाल्या. गव्याने त्यांना पाठीमागून धडक दिल्याने त्या जमिनीवर कोसळून जखमी झाल्या.  त्यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

शालन या शेतात ऊस भांगलण करण्यासाठी गेल्या होत्या. हिरण्यकेशी नदी पार करून गव्यांचा कळप ऊसात शिरला. गव्यांचा कळपाचा मोठा आवाज आल्याने भांगलणीसाठी आलेल्या महिलांनी शेतातून पळ काढला. यावेळी पाठीमागून वेगाने आलेल्या गव्याने पाठीमागून धडक दिल्याने शालन जमिनीवर कोसळल्या. गव्यांचा कळप निघून गेल्यानंतर शेतातील महिलांनी माहिती देताच ग्रामस्थांनी शेतात धाव घेत त्यांना उपचारासाठी दाखल केले.  

गेल्या तीन महिन्यात सलग घटना 

यापूर्वी, आजरा तालुक्यात महिलेवर हल्ला केल्याची घटना घडली होती. गव्याने अचानक समोरून येत दिलेल्या धडकेने उज्वला जानबा यादव (वय 40 रा. घाटकरवाडी ता.आजरा ) या जखमी झाल्या होत्या. उज्वला यादव शेतामध्येऊस भांगलण करत गव्याने समोरून येत हल्ला केला. अन्य एका घटनेत पन्हाळा तालुक्यात कसबा ठाणे येथील माजी उपसरपंच माणिक बळवंत पाटील (वय 48) यांचा जागीच मृत्यू झाला होता. गव्याच्या हल्ल्यात थेट छातीत शिंग घूसल्याने ते जागीच ठार झाले. तत्पूर्वी, 25 मार्च रोजी शाहूवाडी तालुक्यातील उदगिरीपैकी केदारलिंगवाडीमधील गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. बंडू बाबू फिरंगे (वय 65 रा. उदगिरीपैकी केदारलिंगवाडी) असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.  

भुदरगड तालुक्यात गव्यांचा कळप 

ही घटना ताजी असतानाच भुदरगड तालुक्यात तब्बल 25 गव्यांचा कळप दिसून आल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.  तालुक्यातील देवकेवाडी ते भुतोबा मंदिर दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणावर गव्यांचा कळप दिसून आल्याने शेतकऱ्यांसह रस्त्यावरून प्रवाशांची बोबडी वळाली. हा गव्यांचा पूर्ण वाढ झाल्याच्या स्थितीत आहेत. 

दुर्गम तालुक्यात गव्यांचा धुडगूस 

जिल्ह्यातील चंदगड, आजरा, भुदरगड आणि गगनबावडा या दुर्गम तालुक्यातील अनेक गावांमध्ये गव्यांचा थेट वावर  वाढला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर दहशतीखाली आहे. गवे थेट मानवी वस्तीत प्रवेश करू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रखर उन्हाळ्यामुळे गव्यांचा अधिवास असलेल्या परिसरात पाणी नसल्याने तसेच चाऱ्याच्या शोधात गवे मानवी वस्तीच्या दिशेने येऊ लागले आहेत. गव्यांकडून उभ्या पिकांना लक्ष्य करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
DY Patil Passes Away Marathi News: असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
D Y Patil passes away: मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget