कोल्हापूर : धावत्या कारमधून 'वाचवा वाचवा'चा आक्रोश कानावर आल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महिलेचा जीव वाचला. महिलेनं धावत्या कारमधून कारमधून उडी मारली. कोल्हापूर (Kolhapur News) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मंगळवारी मध्यरात्री गस्त घालताना एक कार भरधाव वेगात जात असतानाच ‘वाचवा.. वाचवा’ असा आवाज आला.
पोलिसांना शंका आल्याने पोलिसांनी त्यांची दुचाकी कारच्या दिशेनं वळवत नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर सीपीआर चौक, व्हिनस कॉर्नर, धैर्यशील चौकमार्गे कारचा पाठलाग सुरू करण्यात आला. न्याय संकुल परिसरात शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांच्यासह पथकाने ती कार रोखली. कारचा वेग कमी होताच महिलेने रस्त्यावर उडी मारली. मात्र कार पुन्हा भरधाव वेगाने पुढे निघून गेली. अगदी फिल्मीस्टाईलने पाठलागा करण्यात आली वारांगना असलेल्या महिलेची सुटका झाली. गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी झाले.
नेमका प्रसंग काय घडला?
हेड कॉन्स्टेबल अभिजित चव्हाण गृहरक्षक दलाचे जवान चव्हाण यांच्यासह गस्त घालत होते. त्यावेळी एक पांढरी कार चौकात वेगात आली. यावेळी कारमध्ये असलेल्या महिलेनं ‘वाचवा वाचवा’ असा टाहो केला. पोलिसांनी मोटार थांबवण्याचा प्रयत्न करत नियंत्रण कक्षाला माहिती दिल्याने सर्वच यंत्रणा सक्रिय झाली. व्हिनस कॉर्नरपासून कार पुढे जाताना शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांच्या पथकाने पाठलाग सुरू केला. अखेर न्याय संकुलासमोर ती कार पोलिसांनी रोखली. त्याचवेळी महिलेने मोटारीतून रस्त्यावर उडी मारली; मात्र चालक आणि पाठीमागील सीटवर बसलेली व्यक्ती कारसर फरार झाली. प्रथमदर्शनी कार सोलापूरची असल्याची माहिती मिळाली आहे. त्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न गतीने सुरू आहेत.
तोंडाला रुमाल बांधून कारमध्ये बसवले
दरम्यान, या थरारक पाठलागात अपहरण झालेली महिला 30 वर्षांची वारांगना आहे. कळंबा परिसरात ती उभी असताना कार तिच्याजवळ थांबली. यावेळी मागील सीटवर बसलेली व्यक्ती तिच्याजवळ आली आणि तोंड रुमालाने दाबून कारमध्ये बसवले. वारांगनाने फिर्याद दिली आहे.
गौरीशंकर नगर भागातील वेश्या व्यवसाय बंद करा
दरम्यान, खोतवाडी (ता.हातकणंगले) गौरीशंकर नगर भागातील वेश्या व्यवसाय बंद करा, या मागणीसाठी भागातील महिला इचलकरंजीमधील शहापूर पोलिस ठाण्यात एकटवल्या. पोलिसांनी या भागात जावून संबंधिताचे घर गाठले. मात्र घर कुलूपबंद असल्याचे निदर्शनास आले. याबाबत खात्री करून कठोर कारवाई करणार असल्याचे पोलिस निरिक्षक सत्यवान हाके यांनी सांगितले. संबंधित महिला व पती राहत असलेली मिळकत सील करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी केली. यावेळी मागणीचे निवेदन हाके यांना देण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या