हुपरी (जि. कोल्हापूर) : कोल्हापूर पोलिसांच्या (Kolhapur Police) हुपरी पोलिसांनी सुमारे चार लाखांच्या मुद्देमालासह संशयित तीन सराईत महिला चोरांना अटक करत मोठी कारवाई केली आहे. हुपरी, कुरुंदवाड आणि इचलकरंजी शहरात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात हुपरी पोलिसांना यश आलं आहे. चोरी करणाऱ्या संशयित तिन्ही महिला या सांगलीमधील आहेत. सपना समशेर चौगुले, कविता लक्ष्मण चौगुले, पुनम रवी घावट अशी या तिन्ही संशयित महिलांची नावे आहेत. 


या संशयित महिला चोरांची रिमांड घेतल्यानंतर त्यांनी चोरी केल्याचे कबुल केले. तसेच चोरी केलेले सुमारे चार लाखांचे सोन्याचे दागिने पोलिसांकडे दिले. फिर्यादी संजिवनी संतोष साळुखे (रा. चिखळवाळ, कर्नाटक) यांनी हुपरी स्टँडवर आपले दागिने चोरी गेल्याची फिर्याद हुपरी पोलिसात दिली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या तिन्ही सराईत महिला चोरांना सांगलीतून अटक केली.


इतर महत्वाच्या बातम्या