एक्स्प्लोर

Kolhapur Crime : महावितरणाच्या दोन लाचखोर अधिकाऱ्यांना 440 चा 'करंट'; 36 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले!

लाचेची मागणी करण्यात आल्यानंतर ग्राहकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पडताळणी केली असता दोघांनी लाच मागितल्याचे तसेच पाटणकरने बिरनाळेला रक्कम देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले.

कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur Crime) लाचखोरांचा अड्डा झाला आहे का? अशी शंका यावी, अशा पद्धतीने एकावर एक लाचखोर सापडत आहेत. आता या यादीमध्ये महावितरणच्या दोन लाचखोर अधिकाऱ्यांचा भर पडली आहे. अनधिकृतपणे वीज वापर केल्याने झालेल्या दंडाची रक्कम कमी करण्यासाठी 36 हजार रुपयांची लाच घेताना महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता व सहायक लेखापाल रंगेहाथ सापडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. कोल्हापुरातील महावितरणच्या स्टेशन रोडवरील मुख्य कार्यालयात झाली. अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुयोग दिनकर पाटणकर (वय 47, रा. खासबाग मैदान, मंगळवार पेठ, कोल्हापूर, मूळ सोमवार पेठ पन्हाळा, ता.पन्हाळा) व सहायक लेखापाल रवींद्र बापूसाहेब बिरनाळे (वय 38, रा. आमराई रोड, शिक्षक कॉलनी, इचलकरंजी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ग्राहकाकडून लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी बिरनाळे महावितरणच्या स्टेशन रोडवरील कार्यालयात आला होता. कारवाईची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने पाठलाग करुन पकडले. 

तडजोडीने 55 हजार रुपयांची रक्कम मागितली 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार ग्राहकाने स्वत:च्या इमारतीत औद्योगिक परवाना वीज जोडणी करून घेतली होती. तेथील व्यवसाय बंद झाल्यानंतर त्या ग्राहकाने ती इमारत औद्योगिक परवाना वीज जोडणीसह कराराने भाड्याने दिली होती. सप्टेंबर 2023 मध्ये त्यांच्या औद्योगिक परवाना वीज मीटरची पाहणी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्या ग्राहकाने अनधिकृत वीज वापरल्याबद्दल त्याला दोषी ठरवले होते. 

यानंतर 5 वर्षांचा एकूण 1 लाख 22 हजार 678 रुपये दंडाची नोटीस देण्यात आली. हे प्रकरण सुंदर बागेजवळील महावितरणच्या कार्यालयांतर्गत येत असल्याने तेथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता पाटणकर आणि बिरनाळे यांनी त्या ग्राहकाला 5 वर्षाऐवजी फक्त एक वर्षाचा दंड करण्यासाठी म्हणून दंडाची रक्कम 19 हजार आणि दोघांसाठी 41 हजार अशी 60 हजारांची मागणी केली. यानंतर तडजोड करून 55 हजार रुपयांची रक्कम ठरविण्यात आली.19 हजार रुपये दंड सोडून 36 हजार लाचेची रक्कम ठरली.

लाचलूचपत विभागाकडे ग्राहकाची तक्रार

लाचेची मागणी करण्यात आल्यानंतर ग्राहकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पडताळणी केली असता दोघांनी लाच मागितल्याचे तसेच पाटणकरने बिरनाळेला रक्कम देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार हा व्यवहार मुख्य कार्यालयात होणार होता. त्याठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून ही कारवाई केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget