Panhala Landslide : किल्ले पन्हाळगडावरील पडझडीची तज्ज्ञांच्या समितीकडून पाहणी, नगरपरिषदेसह जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर
Panhala Landslide : पन्हाळगडावर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे ऐतिहासिक किल्ल्यावरील पडझड रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीकडून पाहणी करण्यात आली.
Panhala Landslide : पन्हाळगडावर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे ऐतिहासिक किल्ल्यावरील पडझड रोखण्यासाठी बुधवारी आर्किटेक्ट अँन्ड इंजिनियर असोसिएशन, जिओलॉजिस्ट, नगरपरिषद, पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पन्हाळा नाका ते पुसाटी बुरुज मार्गे, सज्जाकोठीपर्यंत ऐतिहासिक वास्तूंची आणि तटबंदीची पाहणी करण्यात आली.
संवर्धन तज्ज्ञ चेतन रायकर, जिओलाॕजिस्ट बाबा जगताप, डॉ. नवघरे, जे. डी. पाटील, श्रीकांत शिंदे, पुरातत्व विभागाचे विजय चव्हाण, आर्किटेक्ट असोसिएशनचे अजय कोराणे, प्रशांत हाडकर, अंजली जाधव, सार्वजनिक बांधकामचे धनंजय भोसले, काटकर हे सर्व अभियंते हजर होते. तर माजी नगराध्यक्ष असीफ मोकाशी, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र धडेल, चंद्रकांत गवंडी आदींनी गडाच्या पडझडीची पाहणी केली.
तज्ज्ञांची समिती गडावरील पडझड रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना आज सादर करण्यात येणार आहे. वास्तुंचे कोणत्या पद्धतीने संरक्षण करता येईल, यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी नेमके काय करावे लागेल याची बैठकीत चर्चा करणार असल्याचे आर्किटेक्ट अँन्ड इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी सांगितले.
पाहणीनंतरचा संपूर्ण आराखडा बनवून असोसिएशन पन्हाळा नगरपरिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करणार आहे. त्यानंतर पुरातत्त्व खात्याकडून परवानगी घेतल्यानंतर पुढील कार्यवाही करणार असल्याचे जिओलॉजिस्ट बाबा जगताप म्हणाले.
गेल्या तीन वर्षांपासून पन्हाळ गडाची चिरेबंदी आणि गडाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर दरडी कोसळल्याने स्थानिक जनतेचा जीव टांगणीला लागला आहे. पन्हाळा- पावनगड हा ग्रामस्थांना वाहतुकीसाठी एकमेव मार्ग आहे. गेल्यावर्षीही गडाच्या मुख्य मार्गावर भूस्खलन झाल्याने तब्बल वर्षभर पन्हाळा रस्ता बंद करण्यात आला होता. यानंतर नगपालिकेकडून बुधवार पेठेतून गडावर जाण्यासाठी पर्याची मार्ग तयार करत दुचाकींना परवानगी दिली होती. मात्र, कालांतराने अवजड वाहतूकही सुरु झाल्याने रस्ता पुन्हा धोकादायक झाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Shivaji University : यूजीसीकडून शिवाजी विद्यापीठाच्या दुरस्थ अभ्यासक्रमांना मान्यता
- Kolhapur News : एकनाथ शिंदे गटाकडून कोल्हापूर जिल्हाप्रमुख घोषित, 'या' दोघांना मिळाली संधी!
- Kolhapur News : कोल्हापूरमध्ये यंदा गणेश विसर्जनासाठी इराणी खाणीमध्ये स्वयंचलित यंत्रणा असणार
- Kolhapur News : वयाच्या 64 व्या वर्षी कोल्हापूरचा वाघ 75 किमी पळतोय! स्वातंत्र्यदिनी रंकाळ्याभोवती 9 तास 9 मिनिटांत 17 फेऱ्या मारून 75 किमी धावण्याचा विक्रम