Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur Crime) खूनांची मालिका सुरुच असून आज करवीर तालुक्यात (Karveer Taluka) दोन महिलांच्या खूनाच्या घटनांनी समाजमन सुन्न झाले आहे. दोनवडेत मुलगा हवा म्हणून पत्नीचा गळा दाबून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली. नराधमाने पत्नीचा खून करून तिला विजेचा शाॅक लागल्याचा बनाव केला होता. अन्य एका घटनेत केर्लेत भावाने बहिणीचा खून केल्याची घटना घडली. खून केल्यानंतर त्याने पोत्यावर रक्ताने गीता प्रताप असे लिहिले होते. पोलीस मृतदेहाचा शोध घेत आहेत. या घटनेने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.


मुलगाच हवा म्हणून पत्नीचा खून 


कौटुंबिक वादातून पतीने केलेल्या हल्ल्यात अश्विनी एकनाथ पाटील (वय 28 रा. दोनवडे ता. करवीर) या महिलेचा मृत्यू झाला. एकनाथला पहिल्या दोन मुली असल्याने मुलगा व्हावा यासाठी अट्टाहास सुरु होता. या अट्टाहासातून दोघांमध्ये  सातत्याने वाद होता. एकनाथकडून मयत पत्नी अश्विनीचा शारीरिक, मानसिक छळ केला जात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पती एकनाथला करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पत्नीचा शॉक लागून मृत्यू झाला असा बनाव एकनाथने केला होता. मात्र, करवीर पोलिसांच्या चौकशीत खुनाचा प्रकार उघडकीस आला.  


कोल्हापुरात गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश 


दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी 17 जानेवारी रोजी बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी बोगस डॉक्टर श्रीमंत पाटील (रा. परिते. ता. करवीर) मदतनीस दत्तात्रय पाटील (रा. शिरसे ता. राधानगरी) आणि सुनील ढेरे (रा. आमजाई व्हरवडे, ता. राधानगरी) या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी या रॅकेटमध्ये (Kolhapur illegal sex determination racket) 12 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. जिल्ह्यातील करवीर, राधानगरी, कागल आणि भुदरगड आणि हातकणंगले याच पाच तालुक्यांमध्ये पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत मुख्य सुत्रधार विजय कोळस्करसह 12 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या