कोल्हापूर : निवडणुकीसाठी राज्यातील छोट्या पक्षांना सुद्धा 288 जागांची तयारी करायची असते. राजकारणामध्ये कधी भांडण होईल आणि कधी वेगळं लढावं लागेल सांगता येत नाही. त्यामुळे 2014 मध्ये वेगळी लढण्याची भूमिका घेतली नसती, तर 288 पैकी 88 जागांवर आम्हाला उमेदवारच मिळाले नसते, अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पाटील आज कोल्हापूरमध्ये बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (25 सप्टेंबर) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. आज कोल्हापूरमध्ये त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या अनुषंगाने बोलताना चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली. 






चंद्रकांता पाटील म्हणाले की, "मी छोट्या पक्षांची ताकद दाखवण्यासाठी दोन-चार मतदारसंघांमध्ये दावा केला तर चुकीचं आहे?" अमित शाह यांच्या दौऱ्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले, की "त्यांनी महाराष्ट्रामध्ये अडीच तासांचा वेळ दिला आहे. पाच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र जो काँग्रेस आणि शरद पवारांचा गड मांडला जातो, त्या ठिकाणी लोकसभेला 10 पैकी चार जागा आमच्या वाट्याला आल्या आहेत." त्यांनी पुढे सांगितले की, "महाविकास आघाडीपेक्षा आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात दोन लाख मतं जास्त आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये यावेळी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना निश्चित जागा वाढून मिळतील." 


कोल्हापुरात किती जागा मिळणार? दादांनी आकडा सांगितला!


दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील 10 पैकी सहा ते सात जागांपर्यंत आमची मजल जाईल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी बोलताना केला. दरम्यान, बदलापूर घटनेवर सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "अशा प्रकारची घटना कोणाच्याही मनाला क्लेश देणारी आहे. आमच्यावर संविधान बदलण्याचा आरोप करणारे ते न्यायालयीन यंत्रणा मानत नसल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.


इतर महत्वाच्या बातम्या