कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघात मोठी ट्विस्ट झाला असून सुरुवातीपासून आघडी घेतलेल्या महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरुड पिछाडीवर आहेत. हातकणंगलेत सुरुवातीपासून अतितटीच्या लढतीत सत्यजित पाटील आघाडीवर असतानाच धैर्यशील माने यांनी आघाडी घेतली आहे. 18 व्या फेरीपर्यंत माने यांनी 12 हजार 118 मतांनी आघाडी घेतली.
सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये सत्यजित पाटील-सरुडकर अल्प मतांनी आघाडीवर होते. फेरीनिहाय अल्प आघाडी घेत सत्यजित पाटील यानी 7 हजारांवर लीड घेतले होते. मात्र, त्यानंतर र्धेर्यशील माने यांनी मोठी आघाडी घेतली आहे. प्रत्येक फेरीत सत्यजीत पाटील आणि धैर्यशील माने यांच्यात मताधिक्य कमी-जास्त होत आहे. या लढतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळ ठोकल्याने साऱ्या राज्याचे लक्ष या निकालाकडे लागून राहिले होते.
दरम्यान, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. शाहू महाराज यांनी निर्णायक 1 लाख 36 हजारांवर आघाडी घेतली आहे. ही आघाडी विजयासाठी निर्णायक आहे. खासदार संजय मंडलिक मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच पिछाडीवर राहिले. पोस्टल मतापासूनच मागे राहिले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या