Maharashtra Live: अजित पवारांच्या विरोधातील पॅनेलचा सेनापतीच पडला, अजितदादा विरोधकांना 21-0 व्हाईटवॉश देणार?

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देशातील ताज्या घडामोडी आणि घडामोडींचे ताजे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यातील पावसाची स्थिती काय, राजकीय घडामोडींना वेग

रोहित धामणस्करLast Updated: 25 Jun 2025 05:33 PM

पार्श्वभूमी

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात. सिल्लोड रोडवरील घटना. धाब्यावर जेवणासाठी रात्री संभाजीनगर येथून पाच मित्र फुलंब्री येथे गेले होते. रात्री जेवण करून परतत असताना  अपघात . अपघात तीन जण जागीच ठार...More

एक इंचही जमीन शक्तिपीठ साठी देणार नाहीत, परभणीत शक्तिपीठबाधीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची होळी करत केले बोंबाबोंब आंदोलन 

एक इंचही जमीन शक्तिपीठ साठी देणार नाहीत 


एक तर तुम्ही राहताल आणि तर आम्ही 


परभणीत शक्तिपीठ बाधीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची होळी करत केले बोंबाबोंब आंदोलन 



शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन अधिग्रहणाला राज्यभरामधून विरोध होतोय त्यातच काल मुख्यमंत्र्यांनी सक्तीने जमीन अधिग्रहण करण्याचा आदेश दिल्याचा आरोप करत या आदेशाची होळी परभणीत शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांनी केलीये तसेच सरकारच्या या धोरणाचा बोंबाबोंब करत निषेधही केलाय महत्त्वाचं म्हणजे आम्ही सरकारने कितीही सक्ती केली तरीही एक इंच ही जमीन देणार नसल्याचा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलाय.अधिकारी मोजणी साठी जर शेतात आले तर एक तर अधिकारी राहतील नाही तर शेतकरी राहतील असा इशाराही यावेळी दिलाय परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येत जोरदार बोंबाबोंब करत सरकार विरोधात घोषणाबाजी ही केलीय..