Hasan Mushrif on Laxman Hake: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्मण हाके यांनी शिवराळ भाषा वापरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही हाकेंचा प्रश्न येताच पिसाळलेल्या कुत्र्याशी तुलना करत संताप व्यक्त केला आहे. पिसाळलेल्या कुत्र्याला फार दगडं मारायची नसतात, तो अंगावर येतो. पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त योग्य पद्धतीने करायचा असतो, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीही हाकेंच्या टीकेवरून प्रत्युत्तर दिलं आहे. 

Continues below advertisement


अजित पवारांवर गल्लीबोळातील हाके बोलतो 


अमोल मिटकरी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच कौतुक वाटतं एक व्यक्तीने राज ठाकरेवर पोस्ट लिहिली त्याला अद्दल घडवण्याच काम मनसे कार्यकर्त्यांनी केलं. देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणी बोललं तर पूर्ण भाजप तुटून पडते. परंतु अजित पवारांवर गल्लीबोळातील हाके बोलतो आणि त्यावर बोलायला कुणी नाही. केवळ अजित पवारांकडे काम करून घ्यायला यायचं आणि त्यांच्यावर कोणी बोलत असेल तर गप्प बसायचे हे योग्य नसल्याचे मिटकरी म्हणाले. 



तेव्हा आम्ही आमची भूमिका देखील मांडू


दरम्यान, शक्तिपीठ महामार्गावर बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूरातून रद्द करण्याची संदर्भात अधिसूचना निवडणुकीपूर्वीच रद्द केली होती. कोल्हापुरातून जाणाऱ्या मार्गाबाबत भूमीसंपदानाची रद्द झालेली प्रक्रिया पुनर्स्थापित करण्याबाबतच्या मुद्द्याला मी आणि आबिटकर यांनी विरोध केला होता. शक्तिपीठ महामार्ग संदर्भात आम्हाला मुख्यमंत्री जेव्हा बोलतील तेव्हा आम्ही आमची भूमिका देखील मांडू. चंदगडमधून जर तो महामार्ग जायला शेतकऱ्यांचा विरोध नसेल तर तो देखील मार्ग अवलंबायला काय हरकत नाही, असे मुश्रीफ म्हणाले. दरम्यान, ठाकरे बंधू मनोमिलनावर हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, एका कुटुंबातील दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. उद्याच्या मेळाव्याला सुद्धा सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत, राजकारणात काय बदल होतात हे नंतर निवडणुकीत जनता ठरवेल. 


दुसरीकडे, कोल्हापुरात सीपीआरमधील मृतदेहाच्या हेडसांडबद्दल बोलताना ते म्हणाले की, मला कल्पना मिळाली. मी आज यासंदर्भात बैठक घेत आहे. सीपीआर अधिष्ठतांबरोबर याबाबत माहिती घेईल आणि संबंधित प्रकारात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. असे प्रकार पुन्हा होणार नाही याचीही काळजी घेऊ


इतर महत्वाच्या बातम्या