Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्ग विरोधात 12 जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन केल्यानंतर आज (4 जूलै) महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी थेट पांडुरंगाला साकडे घालण्यात येणार आहे. राज्यभरातील शेतकरी आणि नेते पंढरपुरात जाऊन पांडुरंगाला मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे म्हणत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी साकडं घालणार आहेत. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या कार्यकर्ते एकत्रितपणे पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला साकडे घालणार आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकारला सद्बुद्धे अशीही पांडुरंगाच्या चरणी विनंती करणार आहेत. शक्तिपीठ रद्द करण्यासाठी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून गेल्या काही दिवसांपासून आक्रमकपणे आंदोलन सुरू आहे.

Continues below advertisement


महामार्ग रद्द व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे असं साकडे घालण्यासाठी कोल्हापुरातील शेतकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहेत. या शेतकऱ्यांबरोबर काँग्रेस नेते सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह  शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय देवणे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरीही जाणार आहेत.  


शक्तीपीठ महामार्ग संदर्भात होणारी आजची बैठक रद्द


दरम्यान, शक्तिपीठ महामार्ग संदर्भात होणारी आजची परळी येथील बैठक रद्द करण्यात आली आहे. हा महामार्ग बीडमधील परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातून जात आहे. आज आमदार धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली परळी व अंबाजोगाई तालुक्यातील भूधारकांची बैठक लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिरात करण्यात आली होती. मात्र, ती बैठक अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आल्याचे पत्र उपविभागीय अधिकारी परळी वैजनाथ यांच्याकडून काढण्यात आले आहे.या आधीच शेतकऱ्यांनी या महामार्गाला मोठा विरोध होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही यावर शेतकरी ठाम आहेत.


राजू शेट्टी यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल


दरम्यान, शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलन केल्या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी  यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. राजू शेट्टी यांच्यासह माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजू बाबा आवळे, शिवसेनेचे नेते विजय देवणे यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोल्हापूरच्या शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या