Kolhapur District Grampanchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव कागल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मुश्रीफ गटाने बाजी मारली. तालुक्यातील पिंपळगाव खूर्दमध्ये मंडलिक-मुश्रीफ गटाने निर्विवाद विजय मिळवला. थेट सरपंच निवडणुकीमध्ये मुश्रीफ गटाच्या शीतल नवाळे यांनी 398 मतांनी विजय मिळवला. ग्रामपंचायतीमध्ये मुश्रीफ-मंडलिक गटाचे 8 तर 3 जागांवर घाटगे गटाचे उमेदवार विजयी झाले. 


कोल्हापूर जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबरला मतदान 


दरम्यान, जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम घोषित झाला आहे. यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.


जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील फये, आजरा तालुक्यातील करपेवाडी, चंदगड तालुक्यातील इसापूर आणि राधानगरी तालुक्यातील बरगेवाडी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. सरपंच थेट जनतनेतून निवडला जाणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने या गावांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. 


निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे



  • 13 सप्टेंबर 2022  : निवडणूक नोटीस प्रसिध्द होणार 

  • 21 ते 27 सप्टेंबर : उमेदवारी अर्ज दाखल करणे 

  • 28 सप्टेंबर  : उमेदवारी अर्जांची छाननी

  • 30 सप्टेंबर  :  उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिवस 

  • 30 सप्टेंबर : निवडणूक चिन्ह तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होणार 

  • 13 ऑक्टोबर :  मतदान 

  • 14 ऑक्टोबर : मतमोजणी 


 इतर महत्वाच्या बातम्या